करण जोहरची मुश्किल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 18:23 IST2016-10-21T18:23:13+5:302016-10-21T18:23:13+5:30

 करण जोहरच्या चित्रपटाची वाट प्रेक्षक आतुरतेने पाहत असतात. त्याचा आगामी सिनेमा 'ए दिल है मुश्किल' हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक ...

Karan Johar's difficult | करण जोहरची मुश्किल

करण जोहरची मुश्किल

class="gmail_quote"> करण जोहरच्या चित्रपटाची वाट प्रेक्षक आतुरतेने पाहत असतात. त्याचा आगामी सिनेमा 'ए दिल है मुश्किल' हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पण या चित्रपटाचा पाकिस्तानी अभिनेता फवाद खान असल्यामुळे तो प्रदर्शित करण्यास मनसेने विरोध दर्शविला आहे. यापूर्वीदेखील करणचे काही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात अडकले होते. अशाच काही चित्रपटांचा लोकमत सीएनएक्सने घेतलेला हा आढावा.

 
१. ए दिल है मुश्किल : सध्या ए दिल है मुश्किल या चित्रपटाची चर्चा चांगलीच रंगली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, ऐश्वर्या रॉय, अनुष्का शर्मा या स्टार कलाकारांसोबत पाकिस्तानी अभिनेता फवाद खान देखील सहभाग आहे.  उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेले सिनेमे प्रदर्शित न होऊ देण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. त्यामुळे फवादची भूमिका असलेला ए दिल है मुश्किल वादाच्या भवऱ्यात सापडला आहे. मात्र दिग्दर्शक करण जोहर 'ए दिल है मुश्किल' प्रदर्शित करण्यासाठी अतोनात प्रयत्न करताना पाहायला मिळतो आहे. 

 
२. फवादच्या भूमिकेच्या आधीही हा चित्रपट वादाच्या भवऱ्यात अडकला होता केआरकेने ए दिल है मुश्किलच्या समर्थनात बोलण्यासाठी करणने पैसे दिल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र करण जोहरने हे आरोप फेटाळून लावत यात काही तथ्य नसल्याचे सांगितले होते. त्यावेळीही हा वाद चांगलाचं रंगला होता.  

  
 
३. माय नेम इज खान : करण जोहर दिग्दर्शित माय नेम इज खान या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी देखील वाद निर्माण झाले होते. या चित्रपटामध्ये शाहरूख खान आणि काजोल या तगडया कलाकारांचा समावेश होका. पण चित्रपटाच्या प्रमोशनच्या अतिउत्साहापोटी बॉलिवूडचा किंग खान याने माझे नाव खान आहे असे सोशल मीडियावर सांगत वाद ओढावून घेतला होता. त्यामुळे शिवसेनेने 'माय नेम इज खान' हा चित्रपट प्रदर्शित होऊ देण्यास विरोध दर्शवला होता. तसेच शाहरूखच्या आयपीएल टीममध्ये पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश असल्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका ही घेण्यात आली होती.

 
४. बॉम्बे-वेलवेट: अभिनेता कमाल खान हा ट्वीट युद्धासाठीच ओळखला जातो. अनुराग कश्यप दिग्दर्शित  बॉम्बे-वेलवेट चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी कमाल खानने वादग्रस्त ट्वीट केले होते. या चित्रपटात रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, करण जोहर या कलाकारांचा समावेश होता. कमाल खान याने अनुराग कश्यप आणि करण जोहर यांना टारगेट करत, हा चित्रपट हिट होणार नाही अशी भविष्यवाणी सांगितली होती. त्यामुळे या चित्रपटादरम्यानदेखील अनुराग-करण-कमाल यांची वादग्रस्त सोशल युद्ध पाहायला मिळाले होते. 

Web Title: Karan Johar's difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.