करण जोहरच्या 'द अनटोल्ड स्टोरी ऑफ सी. शंकरन नायर'मधून उलगडणार इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 16:40 IST2021-06-29T16:38:43+5:302021-06-29T16:40:41+5:30
करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने सी. शंकरन नायर यांच्या अनटोल्ड स्टोरीवर आधारित सिनेमा बनविण्याचं ठरवलं असून त्यांनी त्याची तयारीही सुरू केली आहे.

करण जोहरच्या 'द अनटोल्ड स्टोरी ऑफ सी. शंकरन नायर'मधून उलगडणार इतिहास
करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने स्टील अँड स्टील मीडिया यांच्यासोबत मिळून सी. शंकरन नायर यांच्या अनटोल्ड स्टोरीवर आधारित सिनेमा बनविण्याचं ठरवलं असून त्यांनी त्याची तयारीही सुरू केली आहे.
जालियनवाला बाग हत्याकांडातील सत्य उलगडण्यासाठी शंकर नायर यांनी ब्रिटीश राजवटीविरूद्ध लढाई लढली होती. शंकर नायर यांच्या शौर्याने देशभरातील स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा मिळाली होती.
हा चित्रपट वास्तविक जीवनातील घटनांपासून प्रेरित आहे आणि रघु पलट (शंकर नायर यांचे नातू) आणि त्यांची पत्नी पुष्पा पलट यांनी लिहिलेल्या "द केस टेट शॉक द एम्पायर" पुस्तकातून रूपांतरित केला आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन करण सिंग त्यागी करणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार असून कोणते कलाकार मुख्य भूमिकेत आहेत याची लवकरच घोषणा केली जाईल.