सोनम कपूरच्या लग्नात करण जोहर देणार 'हे' महागडं गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 15:50 IST2018-05-05T10:20:28+5:302018-05-05T15:50:28+5:30

सध्या बी टाऊनमध्ये फक्त सोनमच्या लग्नाचे वारे वाहता येत. सेलिब्रेटी आणि तिचे फॅन्स सोनमच्या लग्नाची वाट मोठ्या आतुरतेने पाहत ...

Karan Johar to give Sonam Kapoor's wedding to 'O' Mahagandha Gift | सोनम कपूरच्या लग्नात करण जोहर देणार 'हे' महागडं गिफ्ट

सोनम कपूरच्या लग्नात करण जोहर देणार 'हे' महागडं गिफ्ट

्या बी टाऊनमध्ये फक्त सोनमच्या लग्नाचे वारे वाहता येत. सेलिब्रेटी आणि तिचे फॅन्स सोनमच्या लग्नाची वाट मोठ्या आतुरतेने पाहत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी डान्सच्या रिहर्सलला वरुण धवन, करण जोहर, अर्जुन कपूर, अनुपम खेर आणि जॅकलिन फर्नांडिससारख्या अनेक कलाकारांनी सोनमच्या घरी हजेरी लावली होती. संगीत सेरेमनीमध्ये वरुण आणि जॅक परफॉर्म करणार असल्याची चर्चा आहे. करण जोहरसुद्धा सोनमच्या संगीत सेरेमनीमध्ये डान्स परफॉर्म करणार आहे तर वडिल अनिल कपूर आणि आई सुनीता आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नासाठी एक स्पेशल एक्टची तयारी करतायेत. संगीत सेरेमनीच्या रिहर्सल दरम्यानचे काही व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर देखील करण्यात आले आहेत. याच दरम्यान अशी माहितीसमोर आली आहे की सोनमचा खास मित्र करण जोहर सोनमसोबत तिचा नवरा आनंद अहुजालासुद्धा गिफ्ट देणार आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार करण जोहर साडी पासून मिठाई पर्यंत अनेक गोष्ट गिफ्ट करणार आहे. करण आपली जवळची मैत्रिण सोनमला आम्रपालीचे झुमके, हातातल्या बांगड्या आणि डायमंडच्या इयररिंग गिफ्ट करणार आहे. याशिवाय तो सोनमला कांजीवरम साडीसुद्धा देणार आहे. ऐवढेच नाही तर करण दिल्लीच्या नाथू स्वीट्सचे मोतीचूरचे लाड्डूसुद्धा गिफ्ट करणार आहे.   

ALSO READ :  'या' कारणामुळे सोनम कपूर-आनंद अहुजाचा लांबला हनीमून..

सोनमच्या लग्नाची हळद, संगीत आणि मेहंदीचा कार्यक्रम 7 मे रोजी मुंबईतील एका फाईव्ह स्टाइल हॉटेलमध्ये पार पडणार आहे. तर 8 मे रोजी वेडिंग सेरेमनी सोनमची आण्टी आणि इंटीरियर डिझायनर कविता सिंग यांच्या बॅण्डस्टॅण्डस्थित आलिशान बंगल्यात पार पडणार आहे. लग्नाचे सर्व विधी घरातच असलेल्या मंदिरात केले जाणार आहेत. त्यांनानंतर दिल्लीत देखील जंगी रिसेप्शन होणार आहे. आनंद अहुजा हा दिल्लीचा असल्यामुळे मुंबईनंतर दिल्लीतदेखील सेलिब्रेशन होणार आहे. लग्नानंतर सोनम लगेच तिचा आगामी चित्रपट 'वीरे दी वेडिंग'च्या प्रमोशनला लागणार आहे.  

Web Title: Karan Johar to give Sonam Kapoor's wedding to 'O' Mahagandha Gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.