​करण जोहरला वाटते पुरुष मित्रांसोबत बाहेर जेवायला जाण्याचीही भिती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 20:37 IST2017-02-11T15:06:45+5:302017-02-11T20:37:40+5:30

बॉलिवूड चित्रपट निर्माता - दिग्दर्शक करण जोहरने आपल्या आत्मचरित्रातून अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. मात्र करणच्या बाबतीत उडणाºया अफवांमुळे ...

Karan Johar feels feared to eat out with male friends! | ​करण जोहरला वाटते पुरुष मित्रांसोबत बाहेर जेवायला जाण्याचीही भिती !

​करण जोहरला वाटते पुरुष मित्रांसोबत बाहेर जेवायला जाण्याचीही भिती !

लिवूड चित्रपट निर्माता - दिग्दर्शक करण जोहरने आपल्या आत्मचरित्रातून अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. मात्र करणच्या बाबतीत उडणाºया अफवांमुळे तो खूपच त्रासला आहे. माझ्या वैयक्तिक जीवनाबद्दल चर्चिल्या जाणाºया अफवांमुळे मी एवढा त्रस्त झालो आहे की, मला आता एखाद्या पुरुष मित्रांसोबत बाहेर जेवायला जाण्याचीही भिती वाटत असल्याचे करण जोहरने सांगितले. 

काही दिवसांपूर्वी करण जोहरची आत्मकथा एन अनसुटेबल ब्वॉयच्या माध्यामतून आपल्या विषयीची अनेक रहस्ये उजगार केली होती. मात्र आताही करणला त्याच्याबद्दल उडणाºया अफवामुळे त्रास सहन करावा लागतो आहे. करण जोहरने हीच व्यथा मांडली करण म्हणला, माझ्या सोबत दिसणाºया कोणत्याही व्यक्तीशी माझे नाव जोडले जाते, यामुळे मला अडचणींचा सामना करावा लागतो. करणा म्हणाला एकदा एका पत्रकारने मला तू कधी शाहरुख सोबत झोपला आहे का? असा प्रश्न विचारला होता. तेव्हा मी त्ुयाला म्हणालो, ‘काय मी तुला विचारू की तू कधी आपल्या भावाबरोबर झोपला आहेस का’

एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये करण म्हणाला, मी एखाद्या पुरुष मित्रासोबत रात्री जेवन करायला जाण्याची मला भिती वाटते कारण प्रत्येक ठिकाणी अशा वावड्या उठतात की जेव्हा मी त्याच्यासोबत जेवन करायला गेलो याचा अर्थ असा क ी मी त्या पुरुषासोबत झोपतो. यामुळे आम्ही दोन मित्र देखील जेवायला बाहेर जाऊ शकत नाही. 
काही दिवासांपूर्वी करण जोहरने आपल्या आत्मचरित्रातून अनेक लोक विशेषत: सेक्सबाबत माझ्याविषयीच्या अफवा पसरवितात. त्या माझ्या कानावरही आल्या आहेत. काहींनी तर शाहरूख खानसोबत माझे नाव जोडले, असा खुलासा केला होता. 

Web Title: Karan Johar feels feared to eat out with male friends!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.