​ करण जोहरची कबुली; सेलिब्रिटी किड्स नसते तर कदाचित मी आलिया - वरूणला ब्रेक दिला नसता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 09:55 IST2017-03-29T04:25:03+5:302017-03-29T09:55:03+5:30

करण जोहरचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत करण बॉलिवूडमध्ये ‘नेपोटिझम’ असल्याचे मान्य करताना दिसतोय.

Karan Johar confessed; If there were no celebrity kids, maybe I would not have given Aaliya - a big break! | ​ करण जोहरची कबुली; सेलिब्रिटी किड्स नसते तर कदाचित मी आलिया - वरूणला ब्रेक दिला नसता!

​ करण जोहरची कबुली; सेलिब्रिटी किड्स नसते तर कदाचित मी आलिया - वरूणला ब्रेक दिला नसता!

ही दिवसांपूर्वी कंगना राणौतने करण जोहरवर  ‘नेपोटिझम’चा (नातेवाईकांसाठी, सगेसोय-यांसाठी केलेली वशिलेबाजी) आरोप केला होता. हा आरोप करणच्या चांगलाच वर्मी लागला होता. यानंतर करणनेही कंगनाला सडेतोड उत्तर दिले होते. मी कंगनाच्या ‘व्हिक्टिम कार्ड’ने वैतागलो आहे. बॉलिवूडमध्ये तिच्यावर इतका अन्याय होत असेल तर तिने खुश्शाल ही इंडस्ट्री सोडून जावे, असे करण म्हणाला होता. करण - कंगनाच्या या शाब्दिक युद्धानंतर बॉलिवूडमध्ये ‘नेपोटिझम’च्या मुद्यावर चांगलाच वाद-विवाद सुरु झाला होता. अनेक कलाकारांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. काहींनी बॉलिवूडमध्ये ‘नेपोटिझम’ आहे, या कंगनाच्या मताला दुजोरा दिला होता. तर काहींनी असे काहीही नसल्याचे ठणकावून सांगितले होते. यानंतर खरे तर हा वाद ब-यापैकी शांत झाला होता. पण अशातच करणचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे.  
{{{{twitter_video_id####}}}}



या व्हिडिओत करण  बॉलिवूडमध्ये ‘नेपोटिझम’ असल्याचे मान्य करताना दिसतोय. आलिया भट्ट व वरूण धवन हे दोघे सेलिब्रिटी किड्स नसते तर कदाचित मी त्यांना ब्रेक दिला नसता, अशी कबुली करण यात देतो आहे. आलिया ही महेश भट्टची मुलगी होती आणि वरूण हा डेव्हिड धवनचा मुलगा होता. कदाचित यामुळे मी त्यांना ब्रेक दिला,असे करणने यात म्हटले आहे. वरूण डेव्हिड धवनचा मुलगा होता.
म्हणून माझ्या सेटवर तो सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पोहोचला. यानंतर तो एक मुव्ही स्टार होऊ शकतो, असे मला वाटले आणि मी त्याला संधी दिली, असे करण यात म्हणतोय. माझे वडिल चित्रपट निर्माते नसते तर कदाचित मी बॉलिवूडमध्ये नसतो, असेही करणने या व्हिडिओत मान्य केले आहे.

ALSO READ : पटत नाही तर बॉलिवूड सोड...करण जोहरने घेतला कंगना राणौतचा बदला!!

करणचा हा व्हिडिओ एका मुलाखतीचा आहे. अनुपमा चोप्रा त्याची मुलाखत घेताना दिसतेय. या व्हिडिओत दीपिका पादुकोण आणि टिस्का चोप्राही दिसताहेत. यात करण ‘स्टुडंट आॅफ दी इअर’ या चित्रपटाबद्दल बोलतोय. करणच्या याच चित्रपटाद्वारे आलिया व वरूणने बॉलिवूड डेब्यू केले होते.
 
 

Web Title: Karan Johar confessed; If there were no celebrity kids, maybe I would not have given Aaliya - a big break!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.