अनुष्का शर्मानंतर कपूर खानदानची मुलगी अडकणार लग्नाच्या बेडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 16:07 IST2017-12-23T10:37:15+5:302017-12-23T16:07:15+5:30

अनुष्का शर्माने लग्नात काय साडी परिधान केली, कोणते दागिने घातले या प्रत्येक गोष्टीची मीडियापासून ते सर्व सामान्यांपर्यंत चर्चा झाली. ...

Kapoor Khan's daughter gets married to Anushka Sharman | अनुष्का शर्मानंतर कपूर खानदानची मुलगी अडकणार लग्नाच्या बेडीत

अनुष्का शर्मानंतर कपूर खानदानची मुलगी अडकणार लग्नाच्या बेडीत

ुष्का शर्माने लग्नात काय साडी परिधान केली, कोणते दागिने घातले या प्रत्येक गोष्टीची मीडियापासून ते सर्व सामान्यांपर्यंत चर्चा झाली. दिल्लीत रिसेप्शन दिल्यानंतर मुंबईत हि जंगी पार्टी होणार आहे. अनुष्काचे लग्न शाही आणि रॉयल वेडिंग झाले. विरुष्काच्या लग्नाची चर्चा ताजी असतानाच बॉलिवूडमधील आणखीन एक अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकायला तयार झाली आहे. ती फक्त अभिनेत्रीच नाही तर कपूर खानदानची मुलगीसुद्धा आहे. तीन वर्षांपासून   कपूर खानदानची ही लाडकी लेक एका बिझनेसमनला डेट करते आहे. अनेक वेळा सोनम कपूरला तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरताना बघण्यात आले आहे. सोनम कपूरचा ही आता लग्न करण्याच्या मूडमध्ये आहे. गेल्या तीन वर्षांपासून सोनम आनंद अहुजाला डेट करते आहे. आनंद दिल्ली बेस्ड बिझनेसमन आहे. सोनम आणि आनंदने कधीही त्यांच्यातील रिलेशनशिपविषयी जाहिरपणे सांगितले नाही. दोघेही त्यांचे नाते प्रायव्हेट ठेवू इच्छितात. मात्र प्रत्येकवेळी हे दोघे एकत्र बघावयास मिळत असल्याने त्यांच्यात काही तरी जवळचे नाते असावे अशी नेहमीच चर्चा रंगत आली आहे. सोनम अनेकवेळा आनंदसोबतचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. 

सूत्रांच्या माहितीनुसार सोनम कपूर आणि आनंद 2018 ला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. लग्नासाठी दोघांनी जोधपूरच्या लोकेशनची निवड केली आहे. आनंद फॅशन ब्राँड Bhane चा मालक आहे. त्याचे शिक्षण अमेरिकेत झाले आहे. 

ALSO READ :  मासिक पाळीच्या काळात देवळात आणि किचनमध्ये जायचे नाही असे सोनम कपूरला बजावले होते तिच्या आजीने

सध्या सोनम तिचा आगामी चित्रपट वीरे दी वेडिंगच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात सोनमशिवाय करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे. ‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे. सोनम कपूरची बहीण रिया कपूर या चित्रपटाची सहनिर्माती आहे. करिनाच्या लग्नाला तिच्या तीन मैत्रिणी येतात आणि मग एकापाठोपाठ एक अशा धम्माल गोष्टी घडतात. महिला आणि त्यांच्या भावना या दाखवल्या जाणार आहेत  

Web Title: Kapoor Khan's daughter gets married to Anushka Sharman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.