कंगना, धोनी, विराटचे ठुमके...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 16:42 IST2016-04-07T00:56:01+5:302016-04-07T16:42:53+5:30

टीम इंडियाचे ‘हॉस्टेस्ट मेन’ एम एस धोनी व विराट कोहली हे दोघे आणि बॉलिवूड ‘क्वीन’ कंगना लवकरच एकत्र दिसू ...

Kangna, Dhoni, Virat towel ... | कंगना, धोनी, विराटचे ठुमके...

कंगना, धोनी, विराटचे ठुमके...

म इंडियाचे ‘हॉस्टेस्ट मेन’ एम एस धोनी व विराट कोहली हे दोघे आणि बॉलिवूड ‘क्वीन’ कंगना लवकरच एकत्र दिसू शकतात. अर्थात चित्रपटात नाही तर एका जाहिरातीत, ही बातमी आम्ही तुम्हाला काल दिली होतीच. आज मुंबईत या कमर्शिअल जाहिरातीचे शूट पार पडले. या शूटची काही छायाचित्रे आमच्या हाती लागली आहेत. यात धोनी व विराट आपल्या आयपीएलच्या जर्सीत आहेत तर कंगना आपल्या सुपरकूल  ‘क्वीन’ अवतारात आहे. तिघांनीही बर्थ डे कॅप घातलेल्या आहेत. ‘लंडन ठुमकदा...’वरचे कंगनाचे ठुमके आपण बघितलेच..आता कंगनाच्या सोबतीने कदाचित धोनी व विराटला ठुमके लावताना दिसतील...तेव्हा बघूयात!!!


.....................................

​व्वा!! धोनी-विराट अन् कंगना
होय, एका ताज्या बातमीवर विश्वास ठेवाल तर, टीम इंडियाचे ‘हॉस्टेस्ट मेन’ एम एस धोनी व विराट कोहली हे दोघे आणि बॉलिवूड ‘क्वीन’ कंगना लवकरच एकत्र दिसू शकतात. अर्थात चित्रपटात नाही तर एका जाहिरातीत. लवकरच छोट्या पडद्यावर येऊ घातलेल्या या कमर्शिअल जाहिरात कंगना विराट व धोनीसोबत काम करताना दिसेल. सध्या सगळे काही गुलदस्त्यात असले तरी, येऊ घातलेल्या टी-२० सिरिजदरम्यान ही जाहिरात प्रसारित केली जाऊ शकते. उद्या मुंबईत या जाहिरातीत एक दिवसाचे शूट पूर्ण केले जाईल. राजकुमार हिरानी हे या जाहिरातीचे दिग्दर्शक असतील. आत्तापर्यंत फार मोजक्या अभिनेत्री क्रिकेटपटूंसोबत जाहिरातीत झळकलेल्या आहेत. अनुष्का कोहलीसोबत झळकली. प्रियंका चोपडा क्रिस गेलसोबत तर प्रीति झिंटा धोनीसोबत झळकलेली दिसली. आता कंगना प्रथमच धोनी व विराट या टीम इंडियातील दोन टॉप मोस्ट क्रिकेटपटूंसोबत झळकणार आहे. तेव्हा कंगनाला आणि तिच्या नव्या को-स्टार्सला शुभेच्छा देऊ यात!!

Web Title: Kangna, Dhoni, Virat towel ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.