इंटरनेटवर व्हायरल झाला कंगना राणौतचा शाही अंदाज, राणी लक्ष्मीबाईंच्या लूकमध्ये दिसली कंगना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 10:32 IST2017-10-28T04:51:04+5:302017-10-28T10:32:08+5:30

कंगना गेल्या काही दिवसांपासून जयपूरमध्ये आहे. तिथे ती तिचा आगामी चित्रपट 'माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'च्या शूटिंग करते ...

Kangana royal royal style of the internet, Virgo seen in the look of Queen Laxmibai | इंटरनेटवर व्हायरल झाला कंगना राणौतचा शाही अंदाज, राणी लक्ष्मीबाईंच्या लूकमध्ये दिसली कंगना

इंटरनेटवर व्हायरल झाला कंगना राणौतचा शाही अंदाज, राणी लक्ष्मीबाईंच्या लूकमध्ये दिसली कंगना

गना गेल्या काही दिवसांपासून जयपूरमध्ये आहे. तिथे ती तिचा आगामी चित्रपट 'माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'च्या शूटिंग करते आहे.  चित्रपटाच्या सेटवरून राणी लक्ष्मीबाईच्या पेहरावातील कंगनाचे काही फोटो लीक झाले आहे. त्यात कंगनाने साधी क्रिम कलरची साडी नेसली आहे. कपाळावर लाल टिकली आणि खांद्यावर चौकटीची शाल घेतलेली दिसत आहे. त्याच बरोबर भूमिकेनुसार तिच्या चेहऱ्यावर गंभीर एक्सप्रेशनसुद्धा दिसतायेत.  ह्या फोटोंमध्ये ती सीन्सच्या आधीचे संवाद पाठ करताना दिसते आहे. या चित्रपटाची पटकथा बाहुबली फेम लेखक विजेंद्र प्रसाद आणि प्रसून जोशीने लिहिली आहे.जयपूरच्या अमर महलामध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. 

यात बाई झलकारी बाईच्या भूमिकेत अंकिता लोखंडे दिसणार आहे. या चित्रपटातून अंकिता लोखंडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. इंग्रज सेनानी ह्यू रोज याच्या सैन्याने झाशीच्या किल्ल्यावर निकराचा हल्ला केला असता, झलकारीबाईच्या सल्ल्यानुसार राणीने झाशीचा किल्ला रात्रीच्या अंधारात सोडला. यादरम्यान झलकारीबाई यांनी राणीप्रमाणे वेश धारण करून ह्यू रोजच्या सैन्याशी युद्ध केले. पण ते नाटक इंग्रज सैनिकांना समजले. त्यांनी झलकारीबाईला पकडले व फासावर लटकवले होते. यात अतुल कुलकर्णी तात्याराव टोपेंच्या भूमिकेत दिसेल तर वैभव तत्त्ववादी पूरण सिंह हे पात्र साकारणार आहे.  पुरण सिंह हा राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक भरवशाचा सरदार होता. राणीच्या रक्षणासाठी त्याने जीवाची बाजी लावली होती. वैभव हीच भूमिका साकारणार आहे.

ALSO READ :   ‘बहिष्कृत’कंगना राणौतला आमिर खानचा ‘आधार! वाचा सविस्तर बातमी!!

काही  महिन्यांपूर्वी या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कंगनाला अपघात झाला होता. एका सीनमध्ये कंगनाला तलवार बाजी करायची होती हा सीन करत असताना तिच्या डोक्याला दुखापत झाली होती. कंगणाची ही दुखापत इतकी गंभीर आहे की तिच्या कपाळावर तब्बल 15 टाके पडले होते.
काही दिवसांपासून ह्रतिक रोशन आणि आदित्य पांचोलीसोबत झालेल्या वादानंतर ती चांगलीच चर्चेत आली आहे. तर काही दिवसांपूर्वी बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला सिमरन चित्रपट फ्लॉप झाला. त्यामुळे तिला आगामी चित्रपट  'माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'कडून खूप अपेक्षा आहेत. 

Web Title: Kangana royal royal style of the internet, Virgo seen in the look of Queen Laxmibai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.