कंगना राणौत म्हणते, आयोजकांनी माझे अॅवॉर्ड सोहा अली खानला दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 14:16 IST2017-12-22T08:46:38+5:302017-12-22T14:16:38+5:30

कंगना राणौत आणि वाद हे जणू आता समीकरणच झाले आहे. कंगना आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका अॅवॉर्ड ...

Kangana Ranout says, the organizers gave my award to Soha Ali Khan | कंगना राणौत म्हणते, आयोजकांनी माझे अॅवॉर्ड सोहा अली खानला दिले

कंगना राणौत म्हणते, आयोजकांनी माझे अॅवॉर्ड सोहा अली खानला दिले

गना राणौत आणि वाद हे जणू आता समीकरणच झाले आहे. कंगना आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका अॅवॉर्ड शोमध्ये पोहोचायला उशीरा झाला म्हणून तिचे अॅवॉर्ड आयोजकांवी सोहा अली खानला दिले. ट्रॉफिकमध्ये फसल्यामुळे मला उशीर झाला हि गोष्ट जेव्हा आयोजकांना कळली त्यावेळी त्यांनी मला देण्यात येणारे सपोर्टिंग एक्ट्रेसचे अॅवॉर्ड सोहाला दिले. कंगनाला 2007 मध्ये रिलीज झालेल्या लाइफ इन ए मेट्रोसाठी अॅवॉर्डमध्ये मिळणार होते. मात्र तिला अॅवॉर्ड सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाल्याने ते अॅवॉर्ड 2006 मध्ये आलेल्या रंग दे बसंती चित्रपटासाठी सोहाला देण्यात आले.  

2013मध्ये रिलीज झालेल्या क्रिश 3 चित्रपटासाठी देखील कंगनाला सपोर्टिंग एक्ट्रेसचे अॅवॉर्ड देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यावेळी ती अमेरिकेत होती. त्यामुळे हे अॅवॉर्ड 2013 मध्ये आलेल्या गोलियों की रासलीला-रामलीला चित्रपटासाठी सुप्रिया पाठकला देण्यात आल्याचे कंगनाने सांगितले आहे. कंगनाने केलेल्या या खुलासांमुले ती पुन्हा एकदा विवादात अडकण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. काही महिन्यांपूर्वी कंगनाने करण जोहर आणि ऋतिक रोशनवर देखील अनेक आरोप केले होते.    

ALSO READ :  कंगना राणौत पुन्हा बोलली! म्हणे, ‘पद्मावती’चा वाद निव्वळ ड्रामा!

कंगनाचा 'माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित आहे. यात कंगना राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणार आहे. 'ह्या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या चित्रपटात भरपूर युद्धचे दृश्य आहेत' याआधी लेखक विजयेंद्रने बाहुबली आणि बजरंगी भाईजान सारख्या चित्रपटांची कथा लिहिली आहे त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाकडून फार अपेक्षा आहेत. अंकिता लोखंडे याच चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे.  यात अतुल कुलकर्णी तात्याराव टोपेंच्या भूमिकेत दिसेल तर वैभव तत्त्ववादी पूरण सिंह हे पात्र साकारणार आहे. पुरण सिंह हा राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक भरवशाचा सरदार होता. राणीच्या रक्षणासाठी त्याने जीवाची बाजी लावली होती. वैभव हीच भूमिका साकारणार आहे.

Web Title: Kangana Ranout says, the organizers gave my award to Soha Ali Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.