​कंगना राणौतचे ‘ते’ फोटो लीक झाले नव्हते तर लीक केले गेले होते! वाचा एक आतली बातमी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 10:16 IST2017-10-30T04:46:24+5:302017-10-30T10:16:24+5:30

कंगना राणौत तूर्तास  ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये  बिझी आहे.  कदाचित कुठल्याही वादापेक्षा तिने स्वत:ला ...

Kangana Ranaut's 'The' photo was leaked and leaked! Read an inside news !! | ​कंगना राणौतचे ‘ते’ फोटो लीक झाले नव्हते तर लीक केले गेले होते! वाचा एक आतली बातमी!!

​कंगना राणौतचे ‘ते’ फोटो लीक झाले नव्हते तर लीक केले गेले होते! वाचा एक आतली बातमी!!

गना राणौत तूर्तास  ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये  बिझी आहे.  कदाचित कुठल्याही वादापेक्षा तिने स्वत:ला कामात बिझी करून घेतले आहे. काल-परवा या चित्रपटाच्या सेटवरचे राणी लक्ष्मीबाईच्या पेहरावातील कंगनाचे काही फोटो लीक झाले होते. क्रीम कलरची साझी, कपाळावर लाल कुंकू आणि खांद्यावर चौकटीची शाल अशा पेहरावात कंगना दिसली होती. कंगनाचे हे फोटो लीक झालेत आणि पाठोपाठ आग पसरावी तसे व्हायरल झालेत. पण आता या फोटो लीक प्रकरणामागची एक स्टोरी आमच्या हाती लागली आहे. होय, कंगनाचे ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’च्या सेटवरचे फोटो लीक झाले नव्हते तर लीक केले गेले होते. होय, हे फोटो लीक केले गेले होते आणि खुद्द कंगनाने हे फोटो लीक केले होते. म्हणजेच ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’तील आपला लूक लीक व्हावा, अशी खुद्द कंगनाची इच्छा होती आणि यामागे कारण होते दीपिका पादुकोण.



ALSO READ: इंटरनेटवर व्हायरल झाला कंगना राणौतचा शाही अंदाज, राणी लक्ष्मीबाईंच्या लूकमध्ये दिसली कंगना

आता कंगना व दीपिकाचा काय संबंध, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण संबंध आहे. किमान कंगनाला तरी तसे वाटतेय. होय, दीपिकाचा ‘पद्मावती’मधील लूक आणि तिचे नुकतेच रिलीज झालेले ‘घूमर’ हे गाणे सोशल मीडियावर तुफान गाजतेय. दीपिकाच्या राणी पद्मावतीच्या लूकची जोरदार प्रशंसा होते आहे आणि दीपिकाच्या याच प्रशंसेमुळे कंगनाला म्हणे असुरक्षित वाटू लागले आहे. (कंगना व दीपिका दोघीही ऐतिहासिक पात्र पडद्यावर जिवंत करणार आहेत. कंगना राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारते आहे तर दीपिका राणी पद्मावतीची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.) याच असुरक्षितेतून  कंगनाचा राणी लक्ष्मीबाई लूक जाणीवपूर्वक लीक केला गेल्याचे कळतेय. सूत्रांचे मानाल तर, ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’च्या सेटवरचे कंगनाचे फोटो लीक होणे हा योगायोग नव्हताच. तर हा योगायोग घडवून आणला गेला होता. कदाचित ‘हम भी कुछ कम नहीं,’ असे कंगनाला सिद्ध करायचे असेल. पण हे असे सिद्ध करणे कंगनालाच भारी पडू नये, म्हणजे मिळवले. कारण ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ रिलीज व्हायला सध्या बराच काळ आहे. असे असताना असुरक्षिततेतून निर्माण झालेली ही घाई कंगनावरच बूमरँग होऊ शकते.

Web Title: Kangana Ranaut's 'The' photo was leaked and leaked! Read an inside news !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.