निवांत क्षणाचा आनंद घेत असताना कंगानाच्या मादक अदा पाहिल्या?, रसिकांना नाही रुचल्या….

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 17:37 IST2020-12-23T17:34:57+5:302020-12-23T17:37:15+5:30

बॉलिवूडमधील कलाकारांचे मानधन हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. दीपिका पादुकोण असो किंवा करिना या अभिनेत्रींचं मानधन अभिनेत्यांपेक्षा कमी नाही. मात्र, आता दीपिकाला मात देत कंगना राणावत बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.

kangana Ranaut Shares Bikini Photos From Her Mexico vaction Trip | निवांत क्षणाचा आनंद घेत असताना कंगानाच्या मादक अदा पाहिल्या?, रसिकांना नाही रुचल्या….

निवांत क्षणाचा आनंद घेत असताना कंगानाच्या मादक अदा पाहिल्या?, रसिकांना नाही रुचल्या….

कंगना राणौत अनेकदा पारंपारिक ड्रेस परिधान करण्याला अधिक पसंती देते. कंगनाला कोणत्याही विशेष प्रसंगी साडी नेसण्यास आवडते. दरम्यान, आता कंगनाने आपल्या बदललेल्या स्टाईलने सर्वांनाच चकित केले आहे. वास्तविक, कंगनाने तिच्या चाहत्यांसह स्वत: चा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आपला बोल्ड लूक दाखवताना दिसत आहे. कंगनाने शेअर केलेल्या फोटोत बिकिनीमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये कंगना निवांत बीचवर बसली असून तिने रेड कलरची बिकिनी घातली आहे. कंगनाने शेअर केलेला फोटो पाठमोरा आहे.

फोटो शेअर करत तिने लिहीले आहे की,  'सुप्रभात मित्रांनो. मी मला सर्वात आवडणारी जागा मेक्सिको या ठिकाणी आली आहे. सुंदर, परंतु एक अनपेक्षित ठिकाण मेक्सिकोमधील तुलम या छोट्या आयलँडवरचा हा फोटो आहे.  कंगनाचा हा लूक पाहून अनेकांनी लाईक्स आणि कमेंटस करत पसंती दिली आहे तर काहींना मात्र तिचा हा अंदजा रूचला नाहीय.त्यामुळे तिच्या या फोटोवर टीकाही करताना दिसत आहेत. कंगनाने यावेळी कोणा इतरांवर बोलण्याेक्षी तिच्या न्यू ईयर प्लानही चाहत्यांसह शेअर केला आहे. सध्या  कामातून ब्रेक घेत ती मस्त निवांत क्षण एन्जॉय करत आहे.

बॉलिवूडमधील कलाकारांचे मानधन हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. दीपिका पादुकोण असो किंवा करिना या अभिनेत्रींचं मानधन अभिनेत्यांपेक्षा कमी नाही. मात्र, आता दीपिकाला मात देत कंगना राणावत बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.

 

तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिच्या 'थलाइवी’ सिनेमाचे शूटिंगही तिने पूर्ण केले आहे. ‘तेजस’ सिनेमाच्या शूटिंगसाठी तिने तयारीला सुरूवात केली आहे. 


माझ्यावर संशय घेता, प्रियंका-दिलजीतवर का नाही? 

मी काही बोलले की, माझ्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. प्रियंका चोप्रा व दिलजीत दोसांज यांच्या मनसुब्यांवर असे प्रश्न का उपस्थित केले जात नाहीत? मी राजकारण करते, असे आरोप माझ्यावर होता. हे काय करत आहेत, यांना का विचारले जात नाही? असेही कंगना म्हणाली.
 

Web Title: kangana Ranaut Shares Bikini Photos From Her Mexico vaction Trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.