कंगना थोडक्यात बचावली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 16:34 IST2016-10-15T16:34:05+5:302016-10-15T16:34:05+5:30
बॉलिवूड ‘क्वीन’ कंगना राणौत एका अपघातातून थोडक्यात बचावली. अमेरिकेत तिच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात तिच्या डोक्याला व हाताला ...
new(3).jpg)
कंगना थोडक्यात बचावली!
ब लिवूड ‘क्वीन’ कंगना राणौत एका अपघातातून थोडक्यात बचावली. अमेरिकेत तिच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात तिच्या डोक्याला व हाताला किरकोळ दुखापत झाली. सध्या कंगना हंसल मेहता दिग्दर्शित ‘सिमरन’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. शूटींग संपवून कंगना हॉटेलवर परतत असताना तिच्या गाडीला अपघात झाला. ड्रायव्हरला खोकला आला आणि अचानक त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. यामुळे त्याचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी बाजूच्या तारेच्या कुंपनावर धडकली. या अपघातात कंगना आणि तिच्या सहकाºयांना किरकोळ जखम झाली. त्यांना त्वरित उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेनंतर हंसल मेहता यांनी कंगनाला विश्रांतीचा सल्ला दिला. पण कंगना काही तासांच्या विश्रांतीनंतर लगेच शूटींगसाठी सेटवर हजर झाली. ‘सिमरन’मध्ये कंगना एका घटस्फोटी महिलेची भूमिका साकारणार आहे.