कामवाल्या बाईने शाहरूख खानकडे केली गौरी खानची खळबळजनक तक्रार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 20:21 IST2017-08-17T14:51:36+5:302017-08-17T20:21:36+5:30

‘एकदा आमच्या घरात एक बाई काम करीत होती, तर गौरी आणि करण एकमेकांसोबत चॅट करीत होते. करण बेडवर झोपलेला होता आणि दोघेही जोरजोरात हसून एकमेकांशी बोलत होते. तेव्हा ती कामवाली बाई माझ्याकडे आली आणि म्हणाली, ‘साहेब... जेव्हा तुम्ही घरी नसता तेव्हा...!

Kamwaliya's sister kills Gauri Khan's fierce complaint against Shah Rukh Khan | कामवाल्या बाईने शाहरूख खानकडे केली गौरी खानची खळबळजनक तक्रार!!

कामवाल्या बाईने शाहरूख खानकडे केली गौरी खानची खळबळजनक तक्रार!!

लिवूड कलाकारांच्या लिंक-अपच्या बातम्या नेहमीच समोर येत असतात. बॉलिवूडचा किंग शाहरूख खानचेही नाव या लिस्टमध्ये आहे. कारण बी-टाउनमध्ये किंग खानविषयी असे बरेचसे किस्से समोर आले आहेत. एका व्हिडीओमध्ये त्याला याबाबत असाच काहीसा प्रश्न विचारण्यात आला. शाहरूखला विचारले की, ‘तुझ्याविषयी बºयाचशा अफवा ऐकावयास मिळाल्या, कधी तू याविषयी लाइन क्रॉस केली काय? शाहरूखने या प्रश्नाचे हसत उत्तर देताना म्हटले की, ‘अमेजिंग सेक्स विद आॅल आॅफ देम’ त्यानंतर हसतच शाहरूखने म्हटले की, ‘लोक अशाप्रकारे जेव्हा विचार करतात, तेव्हा मी आश्चर्यचकीत होतो. कारण रिलेशनशिपचा अर्थ हा नसतो. माझे फार लोकांशी लिंक-अप राहिले नाही. फक्त करणला सोडून (हसत) मात्र, याचा अर्थ आमच्यात काही झाले असा होत नाही.’ 

‘यू-ट्यूब अंगा’ नावाच्या चॅनलवर अपलोड असलेल्या या व्हिडीओमध्ये शाहरूख त्याच्या घरातील एक किस्सा सांगताना दिसतो. ‘एकदा आमच्या घरात एक बाई काम करीत होती, तर गौरी आणि करण एकमेकांसोबत चॅट करीत होते. करण बेडवर झोपलेला होता आणि दोघेही जोरजोरात हसून एकमेकांशी बोलत होते. तेव्हा ती कामवाली बाई माझ्याकडे आली आणि म्हणाली, ‘साहेब... जेव्हा तुम्ही घरी नसता तेव्हा...! तिच्या या वक्तव्यानंतर मी तिच्याकडे बघत राहिलो. तिने अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने मला हे सगळं सांगितले. तेव्हा मी तिला म्हटले की, ‘हे बघ तुझ्या अशा सांगण्यामुळे माझा जळफळाट होत आहे. कारण करणने माझ्यासोबत झोपायला हवे’



किंग खानचे हे उत्तर ऐकून त्या कामवालीला काय बोलावे हे सूचतच नव्हते. अर्थात शाहरूखचे हे उत्तर चेष्टामस्करीत होते. असो, शाहरूख आणि अनुष्काचा ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाकडून शाहरूखला खूप अपेक्षा होत्या. मात्र बॉक्स आॅफिसवर चित्रपट करिष्मा दाखविण्यात सपशेल अपयशी ठरला आहे. समीक्षकांच्या मते, शाहरूखचा या चित्रपटातील अभिनय त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वाधिक खराब अभिनय ठरला आहे. 

ट्रेण्ड गुरूनुसार हा चित्रपट वीकेंडपर्यंत ६० कोटी रुपयांची कमाई करेल आणि पहिल्याच हप्त्यात शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवेल. परंतु तसे घडले नाही. प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरविल्याने चित्रपटात अतिशय वाईट पद्धतीने बॉक्स आॅफिसवर पडला आहे. शिवाय शाहरूखच्या स्टारडमलाही धक्का देऊन गेला आहे. या चित्रपटाच्या अपयशामुळे शाहरूखचा करिष्मा ओसरत तर नाही ना? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. 

Web Title: Kamwaliya's sister kills Gauri Khan's fierce complaint against Shah Rukh Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.