कमलचा खुलासा, नात्याबद्दल मी काही बोललोच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 22:01 IST2016-11-02T21:58:37+5:302016-11-02T22:01:06+5:30
प्रसिद्ध अभिनेता कमल हसनने आपल्या नात्याबद्दल कोणतिही पोस्ट केली नसल्याचा दावा केला आहे. माझी महिला मित्र गौतमी तडीमल्लापासून मी ...

कमलचा खुलासा, नात्याबद्दल मी काही बोललोच नाही
गौतमीपासून वेगळे होत असल्याचा हवाला देत कमल म्हणाला, ‘या पोस्टद्वारे आता मी आपली बाजू मांडणार नाही’. माझ्या नावाचा वापर करून कुणीतरी आमच्याशी खेळण्याचा प्रयत्न करीत आहे. तामीळ भाषेत केलेल्या ट्विटमध्ये तो म्हणाला, माझ्या नावाचा वापर करून माझी बाजू मांडणे आमच्या भावानांशी खेळण्यासारखे आहे, हे चुकीचे आहे.
कमल हसनची ही प्रतिक्रिया अशा वेळी महत्त्वाची मानली जात आहे जेव्हा त्याच्या नात्याविषयी सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. कमल हसनच्या नावाने दिवसभर एक प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. या पोस्टमध्ये ‘मी आणि गौतमी वेगवेगळे होत आहोत’ असे लिहिण्यात आले होते.
मंगळवारी गौतमीने ब्लॉग पोस्ट करून 13 वर्षांच्या पार्टनरशिपनंतर कमल हसनपासून वेगळे होत असल्याचे सांगितले होते. ‘हा माझ्या जीवनातील सर्वांत दुखद निर्णयांपैकी एक आहे’ असा उल्लेख गौतमीने आपल्या पोस्टमध्ये केला होता. मात्र वेगळे होण्याचे कोणतेही कारण तिने स्पष्ट केले नाही. या दरम्यान कमल हसनची मुलगी अभिनेत्री श्रृती हसन हिने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौतमी व श्रृतीमध्ये काही कारणांमुळे वाद झाला होता.