​कमाल आर खानची ट्विटरवर वापसी; यावेळी तिन्ही ‘खान’वर केला आरोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 11:11 IST2017-11-26T05:41:23+5:302017-11-26T11:11:23+5:30

गत महिन्यात कमाल आर खान उर्फ केआरकेचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आल्यावर लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. आमिरच्या ‘सीक्रेट ...

Kamal R Khan returns to Twitter All three charges have been filed against Khan | ​कमाल आर खानची ट्विटरवर वापसी; यावेळी तिन्ही ‘खान’वर केला आरोप!

​कमाल आर खानची ट्विटरवर वापसी; यावेळी तिन्ही ‘खान’वर केला आरोप!

महिन्यात कमाल आर खान उर्फ केआरकेचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आल्यावर लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. आमिरच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाचे समीक्षण केआरकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिले होते. पण या समीक्षणात त्याने कथितरित्या चित्रपटाचा शेवट उघड केला होता. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले गेले होते.  ट्विटर अकाऊंट सुरू न झाल्यास केआरकेने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता.शिवाय आत्महत्येची धमकीही दिली होती. अर्थात त्याच्या या धमक्यांना कुणीही भीक घातली नाही. पण म्हणून केआरके गप्प बसणा-यांपैकी नव्हताच. आता त्याने नवे अकाऊंट उघडून ट्विटरवर वापसी केली आहे आणि वापसी करताच आपली सगळी भडास काढली आहे. नव्या ट्विटर अकाऊंटवरून केआरकेने शाहरूख खान, सलमान खान आणि आमिर खान यांना लक्ष्य केले आहे.


शाहरूख, सलमान आणि आमिर खान यांनी माझे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यासाठी दबाव आणला. पण मला चित्रपट समीक्षण करण्यापासून ते रोखू शकत नाही. लोकांना बकवास चित्रपट बघावे लागू नयेत, हा माझा प्रयत्न आहे. मला रोखण्याऐवजी त्यांनी सुमार चित्रपट बनवणे बंद करावे, असे केआरकेने म्हटले आहे. 



ALSO READ : ​बॉलिवूड स्टार्स तर सोडा आता कमाल आर खान घेणार ट्विटरशी पंगा!!

‘पुढील वर्षांत सर्व इटिएट क्रिटिक्स संपवणार, असे काल शाहरूखने एका टॉप डायरेक्टरला म्हटले. धन्यवाद शाहरूख. पुढील दोन वर्षांत तू क्रिटिक्सला संपवतो की स्वत:ला ते बघूच, ’असे केआरकेने म्हटले आहे.
यापूर्वीही एकदा केआरकेचे ट्विटर अकाऊंट काही काळ बंद करण्यात आले होते. अजय देवगणच्या ‘शिवाय’ या चित्रपटाचे चुकीच्या पद्धतीने समीक्षण दिल्याने केआरकेचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले होते.  ‘बिग बॉस’शोमध्ये आला अन् केआरकेला लोक ओळखू लागले. यानंतर केआरकेने ट्विटरवर बॉलिवूड स्टार्सला टार्गेट करून चर्चेत राहण्याचे प्रयत्न केलेत. त्यांच्या या प्रयत्नांना नाही म्हणता, म्हणता चांगलेच यश आले आणि त्यामुळेच चर्चेत राहण्याचा हा फंडा आजही केआरके वापरताना दिसतोयं. 
  

Web Title: Kamal R Khan returns to Twitter All three charges have been filed against Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.