पत्नीनं देश सोडायला सांगितला तर भाईनं तिलाच सोडलं, आमिर खानच खरा देशभक्त, केआरकेचं ट्विट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 05:03 PM2022-03-24T17:03:05+5:302022-03-24T17:43:11+5:30

केआरकेने लिहिले की, 'आमिर खानने आपण खरा देशभक्त असल्याचे सिद्ध केले.'

Kamal r khan commented on aamir khan and his ex wife kiran rao he left his wife but did not leave country | पत्नीनं देश सोडायला सांगितला तर भाईनं तिलाच सोडलं, आमिर खानच खरा देशभक्त, केआरकेचं ट्विट चर्चेत

पत्नीनं देश सोडायला सांगितला तर भाईनं तिलाच सोडलं, आमिर खानच खरा देशभक्त, केआरकेचं ट्विट चर्चेत

googlenewsNext

‘द काश्मिर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाची सध्या देशभर चर्चा आहे. या सिनेमाने 13 दिवसांत 200 कोटींचा गल्ला जमवत इतिहास रचला आहे. द कश्मीर फाईल्सचे  सर्वस्तरातून या चित्रपटाचं कौतुक होत आहे.  बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan)पहिल्यांदा या चित्रपटाबद्दल बोलला आहे. ‘द काश्मिर फाईल्स’ हा सिनेमा प्रत्येक भारतीयाने पाहायला हवा, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. 

आमिर म्हणालो होता, या चित्रपटातील घटना आपल्या देशाच्या इतिहासातील एक अशी घटना आहे ज्यामुळे अनेकांनी खूप काही सोसलं. काश्मिरी पंडितांनी जे भोगलं ते दु:खद आहे. या घटनेवर बनलेला ‘द काश्मिर फाईल्स’ हा सिनेमा प्रत्येक भारतीयाने बघायला हवा. असं आवाहन आमिर खानने केलं होतं. दरम्यान कमाल  खान म्हणजेच केआरकेने आमिर खानच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. केआरकेने लिहिले की, आमिर खरा देशभक्त आहे. 

कमाल खानने आमिरच्या एका जुन्या वक्तव्याबाबत ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. केआरके ट्विट करत म्हणाला, “आमिर खानने आपण खरा देशभक्त असल्याचे सिद्ध केले. त्यांची पत्नी म्हणाली होती की, देशात भीती वाटते… देश सोडून जाऊया. भाईने पत्नीला सोडले, पण देश सोडला नाही.” केआरकेच्या या ट्विटवर काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. 

जुलै 2021 मध्ये आमिर खान (Aamir Khan) व किरण राव (Kiran Rao) यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या 15 वर्षानंतर घटस्फोट घेण्याचा कपलचा हा निर्णय चाहत्यांसाठीही धक्कादायक होता.
 

Web Title: Kamal r khan commented on aamir khan and his ex wife kiran rao he left his wife but did not leave country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.