‘बिग बॉस’चा होस्ट कमल हासन अडचणीत; मानहानीचा दावा दाखल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 14:15 IST2017-08-22T08:45:34+5:302017-08-22T14:15:34+5:30
सध्या ‘बिग बॉस तामिळ’ हा रिअॅलिटी शो चांगलाच चर्चेत आहे. टीआरपी आणि ट्रेंडच्या शर्यतीत या रिअॅलिटी शोने कधीचाच अव्वल ...

‘बिग बॉस’चा होस्ट कमल हासन अडचणीत; मानहानीचा दावा दाखल!
स ्या ‘बिग बॉस तामिळ’ हा रिअॅलिटी शो चांगलाच चर्चेत आहे. टीआरपी आणि ट्रेंडच्या शर्यतीत या रिअॅलिटी शोने कधीचाच अव्वल क्रमांक मिळवला आहे. पण आता केवळ शोच नाही तर या शोचा होस्ट अभिनेता कमल हासन हाही या शोमुळे चर्चेत आलाय. होय, तामिळ रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा होस्ट कमल हासन याच्याविरोधात चेन्नई येथील एका न्यायालयात बदनामी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता हे नेमके प्रकरण काय, हे आम्ही तुम्हाला सांगतो.
१४ जुलैला ‘बिग बॉस’चा एक एपिसोड प्रसारित झाला. या एपिसोडमध्ये कमल हासन याने एका विशिष्ट समुदायाला अपमानित केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. महानगरदंडाधिकारी न्यायालयात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. न्यायाधीशांनी १ सप्टेंबरला या तक्रारीवर सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
इसई वेल्लालर या समुदायात ‘नादस्वरम’ या वाद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या वाद्याची अगदी देवाप्रमाणेच पूजा केली जाते. या वाद्यावरून कमल हासन वादात सापडला आहे. इसई वेल्लालर समुदायाचे अध्यक्ष आर. कुहेश यांंनी केलेल्या दाव्यानुसार, १४ जुलैच्या एपिसोडमध्ये ‘बिग बॉस’ घरातील अभिनेता शक्ती हे वाद्य निष्काळजीपणे एका हातातून दुसºया हातात फेकताना दाखवले गेले. याशिवाय ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धक जेवण करत असताना त्यांनी हे वाद्य पलंगावर ठेवले होते. नादस्वरमचा हा अपमान आम्हा तमाम समुदायाच्या भावना दुखावणारा आहे. या वाद्याचा अपमान होत असूनही विजय टीव्ही, ‘बिग बॉस’चे निर्माते, होस्ट कमल हासन आणि ‘बिग बॉस’च्या सर्व स्पर्धकांनी याकडे दुर्लक्ष केले. घडलेल्या प्रकाराबद्दल कमल हासन यांनी माफी मागणे अपेक्षित होते. पण त्यांनी तसे केले नाही. केवळ टीआरपी वाढवण्यासाठी नादस्वरम वाद्याचा अपमान केला जात असेल तर अशांविरोधात खटला भरुन त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे,असे कुहेश यांनी म्हटले आहे.
ALSO READ : SHOCKING ! ‘बिग बॉग’च्या घरात अभिनेत्री ओवियाचा आत्महत्येचा प्रयत्न!!