सलमान खानला टक्कर देण्यासाठी कमल हासन तयार, ‘बिग बॉस’चा प्रोमो रिलीज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 21:09 IST2017-05-16T15:10:42+5:302017-05-16T21:09:59+5:30

दबंग सलमान खान याच्या ‘बिग बॉस’ शोनंतर अभिनेता कमल हासन तामिळ भाषेत बिग बॉस शो घेऊन येत आहे. या ...

Kamal Haasan is ready to compete with Salman Khan, Bigg Boss Promo Release! | सलमान खानला टक्कर देण्यासाठी कमल हासन तयार, ‘बिग बॉस’चा प्रोमो रिलीज!

सलमान खानला टक्कर देण्यासाठी कमल हासन तयार, ‘बिग बॉस’चा प्रोमो रिलीज!

ंग सलमान खान याच्या ‘बिग बॉस’ शोनंतर अभिनेता कमल हासन तामिळ भाषेत बिग बॉस शो घेऊन येत आहे. या शोचा प्रोमो नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. देशातील सर्वाधिक वादग्रस्त शो म्हणून बघितला जात असलेला ‘बिग बॉस’ हा शो सलमानमुळे सर्वाधिक चर्चेत असतो यात शंका नाही. वास्तविक सलमान अगोदर या शोला अमिताभ बच्चन, अरशद वारसी, शिल्पा शेट्टी यांनी होस्ट केले आहे. पण, सलमानचा जलवा काही औरच आहे. 

आता हा शो तामिळ भाषेत लॉन्च केला जात आहे. विशेष म्हणजे सलमानला टक्कर देण्यासाठी ज्या अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे, त्याचे नाव कमल हासन आहे. होय, कमल हासन तामिळ भाषेतील बिग बॉस शो होस्ट करणार आहेत. काही वेळापूर्वीच कमल हासनने त्याच्या ट्विटर अकाउंटवर शोचा प्रोमो लॉन्च केला आहे. या टीजरमध्ये कमल हासनचा लुक बघितल्यानंतर तुम्ही काहीकाळ सलमानला विसरून जाल यात शंका नाही. दरम्यान, कमल हासन याने याबाबतचाही खुलासा केला की, सलमानच्या बिग बॉस सीजनचे काही एपिसोड बघून त्यातून बरंच काही शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच ‘बिग बॉस’चा तामिळ वर्जनचा पहिलाच टीजर एवढा आकर्षक अन् उत्सुकता निर्माण करणारा वाटत आहे. 



वास्तविक कमल हासन भलेही चित्रपटांमध्ये अ‍ॅक्टिव्ह असले तरी, हल्ली टीव्हीकडे वळण्याचा मजाच काही और आहे. बरेचसे अभिनेते तर टीव्हीवर डेब्यू करण्यासाठी उतावीळ आहेत. मग, यामध्ये कमल हासन याचे नाव पुढे आल्यास फार वावगे ठरू नये. सध्या या बिग बॉस शोची सर्वत्र चर्चा रंग आहे. 

Web Title: Kamal Haasan is ready to compete with Salman Khan, Bigg Boss Promo Release!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.