​कल्की कोच्लिन पडली ‘नीरजा’तील ‘व्हिलन’च्या प्रेमात; लवकरचं लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 16:26 IST2017-08-22T10:56:11+5:302017-08-22T16:26:11+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोच्लिन आणि अनुराग कश्यप यांच्या नात्याची प्रचंड चर्चा झाली. २००९ मध्ये कल्की व अनुराग यांची भेट ...

Kalki Kochlin falls in love with 'Willan' in Neerja; Early marriage? | ​कल्की कोच्लिन पडली ‘नीरजा’तील ‘व्हिलन’च्या प्रेमात; लवकरचं लग्न?

​कल्की कोच्लिन पडली ‘नीरजा’तील ‘व्हिलन’च्या प्रेमात; लवकरचं लग्न?

लिवूड अभिनेत्री कल्की कोच्लिन आणि अनुराग कश्यप यांच्या नात्याची प्रचंड चर्चा झाली. २००९ मध्ये कल्की व अनुराग यांची भेट झाली. यानंतर दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. पण २००९ मध्ये दोघांनीही घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर दोघेही आपआपल्या आयुष्यात बिझी झालेत. होय,पर्सनल अन् प्रोफेशनल दोन्हीही आयुष्यात.
अनुराग त्याच्यापेक्षा २१ वर्षांनी लहान शुभ्रा शेट्टी हिच्या प्रेमात(?) पडला. तर तिकडे कल्कीलाही बॉयफ्रेन्ड मिळाला. आता कल्कीची बातमी किती खरी,किती खोटी ते आम्हाला ठाऊक नाही. पण ‘एअरलिफ्ट’ फेम अभिनेता जिम सर्भ याला कल्की डेट करत असल्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे.
अर्थात अद्याप कल्की व जिम दोघांपैकी कुणीही या नात्याला दुजोरा दिलेला नाही. पण आता तर कल्की व जिम यांच्या लग्नाचीही चर्चा होतेय. कल्की लवकरच जिमसोबत लग्नबंधनात अडकणार, अशा बातम्या आहेत. याबाबत कल्कीला विचारले असताना, तिने यास नकार दिला. सध्या तरी माझा असा कुठलाही इरादा नसल्याचे ती म्हणाली.  



ALSO READ : OMG!! ​इशा गुप्ताचं नाही तर कल्की कोच्लिनही झाली ‘न्यूड’!!

आता खरे काय, हे तिलाच ठाऊक. पण अनुरागसोबतच्या घटस्फोटानंतर कल्की आपल्या आयुष्यात पुढे जात असेल तर तिला शुभेच्छा या द्यायलाच हव्यात. तसेही विश्वास आणि निष्पापभाव या दोन गोष्टीवर विवाहाचे यश अवलंबून असते, असे कल्की मानते. मध्यंतरी एका मुलाखतीत बोलताना कल्कीने विवाहसंस्थेवर स्वत:चे विचार मांडले होते. मी माझ्या आयुष्यात सर्वांत निष्पापभावाने काय केले असेल तर ते लग्न आहे. दुसºया व्यक्तीवर विश्वास ठेवून तुम्ही त्याच्याशी लग्न करता. माझ्यामते, विवाहसंस्थेवर विश्वास टिकून राहावा यासाठी निष्पापभावाचीच गरज आहे,असे ती म्हणाली होती. 
 सोनम कपूरच्या ‘नीरजा’ या चित्रपटात जिमने दहशतवादी खलीलची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेचे बरेच कौतुक झाले होते. ‘नीरजा’मध्ये जिम   निगेटीव्ह रोलमध्ये दिसला. पण भूमिका निगेटीव्ह असूनही जिमने त्यात जीव ओतला. कदाचित त्याचेच फळ म्हणून त्याला ‘राबता’मिळाला. सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती सॅनन यांच्या अलीकडे रिलीज झालेल्या या चित्रपटात जिम महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला. लवकरच तो संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’मध्ये दिसणार आहे. याशिवाय संजय दत्तच्या बायोपिकमध्येही त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

Web Title: Kalki Kochlin falls in love with 'Willan' in Neerja; Early marriage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.