​काकस्पर्श लवकरच प्रदर्शित होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 18:01 IST2017-02-06T12:31:15+5:302017-02-06T18:01:15+5:30

2012 साली प्रदर्शित झालेल्या काकस्पर्श या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या चित्रपटाने 10 कोटीचा गल्ला जमवला ...

Kakshaprasala will soon be displayed | ​काकस्पर्श लवकरच प्रदर्शित होणार

​काकस्पर्श लवकरच प्रदर्शित होणार

2012
साली प्रदर्शित झालेल्या काकस्पर्श या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या चित्रपटाने 10 कोटीचा गल्ला जमवला होता. 2012 सालमधील सर्वात जास्त कमाई करणारा तो चित्रपट ठरला होता. या चित्रपटाची कथा उषा दातार यांनी लिहिली होती. या चित्रपटाचा काळ हा आजचा नसून 1930-1950 सालाचा होता. तसेच या चित्रपटाची पार्श्वभूमी ही कोकणातील होती. या चित्रपटात प्रेक्षकांना एका ब्राम्हण कुटुंबातील कथा पाहायला मिळाली होती. एक विधवा आपल्याच मोठ्या दिराच्या प्रेमात पडल्याचे प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळाले होते. या चित्रपटाची कास्ट अतिशय तगडी होती. सचिन खेडेकर, मेधा मांजरेकर, केतकी माटेगांवकर, प्रिया बापट, संजय खापरे, सविता मालपेकर, अभिजीत केळकर या कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. या कलाकारांच्या भूमिकेचे सगळ्यांनीच प्रचंड कौतुक केले होते. या चित्रपटाच्या यशानंतर काकस्पर्श हा चित्रपट हिंदी, तमीळ भाषेत बनवला जाणार असल्याची घोषणा या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजेकर आणि निर्माती मेधा मांजरेकर यांनी केली होती. या चित्रपटात अरविंद स्वामी, टिस्का चोप्रा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. काकस्पर्श या चित्रपटात सचिन खेडेकरने साकारलेली भूमिका अरविंद तर मेधाची भूमिका टिस्का साकारणार आहे. प्रिया बापटच्या भूमिकेत वैदही परशूराम तर संजय खापरेची भूमिका मिलिंद सोमण साकारणार आहे. महादेव ही भूमिका काकस्पर्शमध्ये अभिजीत केळकरने साकारली होती. आता या भूमिकेत आदिनाथ कोठारे झळकणार आहे. 
या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण झाले असून हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

Web Title: Kakshaprasala will soon be displayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.