काकांचा ‘आशीर्वाद’ होणार जमीनदोस्त?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 02:51 IST2016-02-28T09:51:41+5:302016-02-28T02:51:41+5:30

सुपरस्टार राजेश खन्ना यांना बॉलीवूडमध्ये काका म्हणून ओळखले जाते. सध्या चर्चेचा मुद्दा त्यांचा बंगला ‘आशीर्वाद’ होऊन बसला आहे. त्यांच्या ...

Kaka's 'blessings' to fall? | काकांचा ‘आशीर्वाद’ होणार जमीनदोस्त?

काकांचा ‘आशीर्वाद’ होणार जमीनदोस्त?

परस्टार राजेश खन्ना यांना बॉलीवूडमध्ये काका म्हणून ओळखले जाते. सध्या चर्चेचा मुद्दा त्यांचा बंगला ‘आशीर्वाद’ होऊन बसला आहे. त्यांच्या घराचा नवा मालक बंगला उध्वस्त करणार असल्याचे कळते. हा बंगला वांदे्र येथील कार्टर रोडवर असून ते गेल्या दोन आठवड्यापासून बंगला उध्वस्त करण्याच्या प्रयत्नात आहेत.

२०१२ मध्ये राजेश खन्नाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी आॅल कार्गाे लॉजिस्टिक्सचे संस्थापक शशी किरण शेट्टी यांना जवळपास ९० कोटी रूपयांना विकले होते. शेट्टी यांनी तिथे चार कुटुंब राहतील अशापद्धतीने पुन्हा बंगला बांधण्याचे ठरवले आहे. खन्ना यांनी मृत्यूपूर्वी सांगितले होते की, त्यांचा बंगला म्युझियम म्हणून ओळखला जावा. पण सध्या तरी परिस्थिती वेगळी दिसते आहे. 

Web Title: Kaka's 'blessings' to fall?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.