काजोल आठ वर्षांनंतर पुन्हा होणार सिंगल मदर, वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 22:23 IST2018-01-25T16:53:50+5:302018-01-25T22:23:50+5:30

बॉलिवूड अभिनेत्री काजोल काही दिवसांपूर्वीच दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषसोबत ‘व्हीआयपी-२’मध्ये झळकली होती. तिच्या या चित्रपटाने सरासरी कमाई केली, परंतु काजोलची ...

Kajol to be reunited after eight years, Read More | काजोल आठ वर्षांनंतर पुन्हा होणार सिंगल मदर, वाचा सविस्तर!

काजोल आठ वर्षांनंतर पुन्हा होणार सिंगल मदर, वाचा सविस्तर!

लिवूड अभिनेत्री काजोल काही दिवसांपूर्वीच दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषसोबत ‘व्हीआयपी-२’मध्ये झळकली होती. तिच्या या चित्रपटाने सरासरी कमाई केली, परंतु काजोलची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच पसंत पडली होती. आता पुन्हा एकदा काजोल रूपेरी पडद्यावर परतणार आहे. वास्तविक लग्न आणि मुलांच्या जन्मानंतर काजोल इंडस्ट्रीतून काही काळ गायब झाली होती, मात्र आता ती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतली आहे. 

काजोल आणि अजय देवगणच्या प्रोडक्शनअंतर्गत बनविण्यात येत असलेल्या या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. होय, ‘इला’ असे नाव असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रदीप सरकार करीत आहेत. या चित्रपटात काजोल पुन्हा एकदा सिंगल मदरच्या भूमिकेत दिसणार आहे. तब्बल आठ वर्षांनंतर काजोल सिंगल मदर बनणार असल्याने तिच्या चाहत्यांना या चित्रपटाची प्रतीक्षा लागली आहे. 

चित्रपटाची कथा आई आणि मुलांमधील संबंधांवर आधारित असून, काळजाचा ठाव घेणारी असणार आहे. सध्या दिग्दर्शक प्रदीप सरकार चित्रपटातील डायलॉगचे काम करीत आहेत. यापूर्वी प्रदीप सरकारने ‘परिणिता’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाविषयी बोलताना प्रदीप सरकारने म्हटले की, काजोलची निवड अचूक आहे. यावेळी त्यांनी काजोलचे सौंदर्य आणि अ‍ॅक्टिंगचे कौतुकही केले. काजोलने यापूर्वी २०१० साली ‘वी आर फॅमिली’ या चित्रपटामध्ये सिंगल मदरची भूमिका साकारली होती.  

Web Title: Kajol to be reunited after eight years, Read More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.