​काजल म्हणते, 'बाहुबली ३' मध्ये काम करण्याची संधी सोडणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2016 16:29 IST2016-11-06T16:29:12+5:302016-11-06T16:29:12+5:30

‘बाहुबली’ च्या आगामी सिक्वलमध्ये काम करणे हीच माझी प्राथमिकता असेल, असे मत अभिनेत्री काजल अग्रवाल हिने व्यक्त केले आहे. ...

Kajal says, 'Bahubali 3' will not have the chance to work | ​काजल म्हणते, 'बाहुबली ३' मध्ये काम करण्याची संधी सोडणार नाही

​काजल म्हणते, 'बाहुबली ३' मध्ये काम करण्याची संधी सोडणार नाही

ong>‘बाहुबली’ च्या आगामी सिक्वलमध्ये काम करणे हीच माझी प्राथमिकता असेल, असे मत अभिनेत्री काजल अग्रवाल हिने व्यक्त केले आहे. ‘बाहुबली’च्या पहिल्या व आगामी दुसºया भागात जरी काम करता आले नसले तरी ती या चित्रपटाचा पुढील भाग तयार झाल्यास त्यात काम करण्यासाठी उत्सुक आहे असेच दिसते. 

बेंगलुरु येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात तिने आपल्या मनातील इच्छा बोलून दाखविली. काजल अग्रवाल म्हणाली, बाहुबली ३ जेव्हा केव्हा तयार होईल तेव्हा जर दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांनी मला संधी दिली तर, मी या चित्रपटात नक्कीम काम करेन. बाहुबली सारखे चित्रपट वारंवार तयार होत नाहीत. यामुळे अशा चित्रपटात काम करण्याची संधी कुणीच सोडू शकत नाही. मग मी अशी संधी का सोडावी? बाहुबलीमध्ये अभिनय करण्यासाठी मी सर्व महत्त्वाच्या कामांना डावलून याच चित्रपटात काम करेन.



बाहुबलीच्या पहिल्या दोन भागात मला काम करता आले नाही याचे मला मुळीच दु:ख नाही, मात्र या चित्रपटाचा मला अभिमान वाटतो. आम्ही त्या इंडस्ट्रीचा भाग आहोत जेथे बाहुबलीसारखे चित्रपट तयार केले जातात. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तराचा असल्याचा उल्लेखही काजलने केला. एका प्रश्नाच्या उत्तरात काजल म्हणाली, बाहुबलीसारखे चित्रपट नेहमी तयार केले जात नाहीत, असे चित्रपट फार महागडे ठरतात. सामान्यत: इंडस्ट्री अशा चित्रपटांचा भार सहन क रू शकत नाही. राजमौली यांनी हा चित्रपट निर्माण केला आणि आतंरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण केली. 

सामान्यत: कलाकार कोणत्या चित्रपटात काम करणार किंवा नाही याबद्दल बोलत नाही. मात्र काजलने ‘बाहुबली ३’चा उल्लेख करून तिचा हा आगामी प्रोजेक्ट असू शकतो याचे सुतोचाव केले आहे. 

Web Title: Kajal says, 'Bahubali 3' will not have the chance to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.