'या' अभिनेत्याने काजल अग्रवालसोबत केली होती गैरवर्तणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 08:00 IST2019-06-23T08:00:00+5:302019-06-23T08:00:00+5:30
काजल अग्रवालने 2004 मध्ये आलेल्या ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयच्या 'क्यों हो गया ना' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते

'या' अभिनेत्याने काजल अग्रवालसोबत केली होती गैरवर्तणूक
ठळक मुद्देकाजल आज साऊथ सिने इंडस्ट्रीमध्ये टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते
काजल अग्रवालने 2004 मध्ये आलेल्या ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयच्या 'क्यों हो गया ना' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात काजलने ऐश्वर्याच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे. त्यानंतर तिने कल्याण रामसोबत 2007 मध्ये 'लक्ष्मी कल्याणम' या तेलगु सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केला होता. मात्र काजलला खरी ओळख मिळाली ती एस.एस. राजमौली यांच्या मगाधीर सिनेमातून. काजल आज साऊथ सिने इंडस्ट्रीमध्ये टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.
काजलने तिचं मुंबईतील कॉलेजमधून मास मीडियामध्ये ग्रॅज्यूएशन केलं आहे. अभिनेत्री नाही तर काजलला टिव्ही पत्रकार व्हायचे होचे. , काजल ही मुंबईची असून इथेच ती लहानाची मोठी झाली
काजलचे अनेक वादही चर्चेत राहिले. रणदीप हुड्डाने जबरदस्ती किस केल्याचा आरोप काजलने लावला होता. 'दो लफ्जो की कहानी' या बॉलिवूड सिनेमातील काजल आणि रणदीप हुड्डाचा लिपलॉक सीन चांगलाच गाजला होता. काजलला आधी माहीत नव्हतं आणि अचानक रणदीपने येऊन तिला किस केलं. काजल यासाठी तयार नव्हती. यामुळे काजल चांगलीच नाराज झाली होती. शूटिंग सोडून ती निघून गेली होती. त्यानंतर स्क्रिप्टची गरज म्हणून हा सीन पूर्ण केला होता.
काजल 2011मध्ये आलेल्या रोहित शेट्टीच्या सिंघम सिनेमात दिसली होती. याशिवाय ती अक्षय कुमार स्पेशल 26मध्ये झळकली होती. काजल आज साऊथ सिने इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. जवळपास सगळ्याच मोठ्या अभिनेत्यांसोबत तिने काम केलं आहे. आज ती एका सिनेमासाठी 2 कोटी रुपये मानधन घेते.