​कैलाश खेर, अनुराधा पौडवाल ‘पद्मश्री’चे मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 16:19 IST2017-01-25T10:23:26+5:302017-01-25T16:19:32+5:30

केंद्र सरकारने आज (२५ जानेवारी) पद्म पुरस्कारांची घोषणा केली. बॉलिवूडमधील लोकप्रीय पार्श्वगायक कैलाश खेर, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना ...

Kailash Kher, Anuradha Paaval 'Padmashri' honorary | ​कैलाश खेर, अनुराधा पौडवाल ‘पद्मश्री’चे मानकरी

​कैलाश खेर, अनुराधा पौडवाल ‘पद्मश्री’चे मानकरी

ंद्र सरकारने आज (२५ जानेवारी) पद्म पुरस्कारांची घोषणा केली. बॉलिवूडमधील लोकप्रीय पार्श्वगायक कैलाश खेर, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहे. प्रजासत्ताक दिनी त्यांना सन्मानित केले जाणार आहे. पद्म पुरस्कारांच्या निवडीसाठी यावेळी वेगळी पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. केंद्र सरकारने मागील वर्षी मे महिन्यात आॅनलाईन पद्धतीने पद्म पुरस्कारांसाठीचे कौल मागवले होते. यात मिळालेल्या तब्बल ५,००० प्रवेशिकांमधून डिसेंबर महिन्यात ५०० नावं अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली. क्रीडा, मनोरंजन, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या लक्षवेधी कामगिरीने वेगळी ओळख निर्माण करून देशाचे नाव उंचावणाºया मान्यवरांचा पद्म पुरस्काराने गौरविण्यात येते. 

 मेरठ येथे जन्मलेल्या कैलाश खेरला गायक बनायचे होते. याच वेडाने झपाटलेल्या कैलाशने १३ व्या वर्षी घर सोडून दिल्ली गाठली. येथे त्याने संगीताचे क्लास लावले. मात्र यासाठी पैसे कमावण्याच्या नादात छोटी-मोठी कामे करू लागला.  २००१ साली त्याने  मुंबई गाठली.  यानंतर रोज  मुंबईच्या स्टुडिओंच्या चकरा मारून काम शोधण्याचे त्याचे प्रयत्न सुरू झाले. यादरम्यान भुकेल्या पोटी राहण्याची वेळही त्याच्यावर आली. अखेर निराश होऊन तो पुन्हा दिल्लीला परतला. यासाठी साड्या एक्सपोर्टचा बिझनेस केला. पण इथेही कैलाशच्या नशिबाने दगा दिला. पण गायक बनण्याची उर्मी कैलाशच्या मनात अजूनही जिवंत होती. तो पुन्हा मुंबईला आला. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आले. २००३ सालच्या ‘अंदाज’ चित्रपटामध्ये त्याने एक गाणे म्हटले जे लोकप्रिय झाले. त्यानंतर कैलाशला मागे वळून पाहावे लागले नाही. त्यानंतर स्वदेस, मंगल पांडे, सरकार इत्यादी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन करून तो प्रसिद्धीस आला. कैलाश सध्या बॉलिवूडमधील एक लोकप्रिय पार्श्वगायक असून त्याला २००७ सालचा सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायकाचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.



अनुराधा पौडवाल म्हणजे लग्नाआधीच्या अलका नाडकर्णी. मराठीसह हिंदी, तमिळ, उडिया, नेपाळी इत्यादी भाषांतील चित्रपटांतूनही अनुराधा यांनी बरेच पार्श्वगायन केले आहे. इ.स. १९७३ सालच्या ‘अभिमान’ नावाच्या हिंदी चित्रपटातील एका संस्कृत श्लोकाच्या गायनातून यांचे पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण झाले. त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘यशोदा’ या मराठी चित्रपटाद्वारे प्रमुख पार्श्वगायिकेच्या रूपात त्यांची कला प्रथमच श्रोत्यांसमोर आली. तेव्हापासून आतापावेतो सुमारे चार दशके चित्रपटगीते, भावगीते व भजनांच्या ध्वनिमुद्रिकांच्या माध्यमांतून या गायन करीत आहेत. दिवंगत संगीतकार अरुण पौडवाल हे अनुराधाबाईंचे पती होते. गायिका कविता पौडवाल या त्यांच्या कन्या आणि आदित्य पौडवाल हे सुपुत्र.

Web Title: Kailash Kher, Anuradha Paaval 'Padmashri' honorary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.