​‘काबिल’चा खलनायक कधी काळी होता हृतिकचा बॉडीगार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 16:27 IST2017-01-22T10:57:06+5:302017-01-22T16:27:06+5:30

हृतिक रोशनचा आगामी ‘काबिल’ हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्याने एका नेत्रहीन व्यक्तीची भूमिका साकारली ...

'Kabil' villain was in the dark when Hrithik's bodyguard | ​‘काबिल’चा खलनायक कधी काळी होता हृतिकचा बॉडीगार्ड

​‘काबिल’चा खलनायक कधी काळी होता हृतिकचा बॉडीगार्ड

तिक रोशनचा आगामी ‘काबिल’ हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्याने एका नेत्रहीन व्यक्तीची भूमिका साकारली असून आपल्या पत्नीच्या खुनाचा बदला घेताना दिसणार आहे. यामुळे ‘काबिल’मध्ये मुख्य खलनायकाची भूमिका रोनित रॉय साकारत आहे. रुपेरी पडद्यावर हृतिक रोशनच्या जीवावर ऊठलेला रोनित कधी काळी त्याचा बॉडीगार्ड होता. 

वाचून आश्चर्य वाटले ना. पण हे खरे आहे. चित्रपटात व टीव्ही मालिकांत काम करण्यासोबतच रोनित रॉय एक सिक्युरिटी कंपनीचा मालक देखील आहे. ही कंपनी बॉलिवूड सेलिब्रेटींना सिक्युरिटी प्रदान करण्याचे काम करते. रोनित स्वत: आमिर खानचा दीड ते दोन वर्षे तर शाहरुख खानचा बॉडीगार्ड म्हणून काही काळ सोबत होता. बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने हृतिक रोशनचा बॉडीगार्ड म्हणून काम केले असल्याचे सांगितले. 



रोनित रॉय म्हणाला, मी लहाणपनापासून हृतिकला ओळखतो, हृतिक स्टार होण्यापूर्वी जेव्हा ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाची शूटिंग करीत होता. त्यावेळी मला राकेश रोशन यांनी हृतिकसोबत राहण्याचे सांगितले होते. काही काळासाठी मी हृतिकचा बॉडीगार्ड होतो. मला सलमानसोबत काम करण्याची संधी मिळाली नाही, मात्र तो माझ्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे असेही रोनित रॉयने सांगितले. Read More : गाणे रिलीज करण्याच्या घाईमध्ये ‘काबील’चे गुपित पडले उघडे

आपल्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल रोनित रॉय म्हणाला, माझे सुरुवातीचे दिवस फारच कठीण होते. मला चित्रपटात फारसे काम मिळत नव्हते. नंतर मी अडीच हजार रुपये दिवसाप्रमाणे एका टीव्ही मालिकेसाठी काम करण्यास सुरूवात केली. आता कुठे मी बॉलिवूडमध्ये स्थिरावण्याचा प्रयत्न करीत आहे. माझा भाऊ रोहित शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार होता, मात्र त्याने बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्याचा पहिलाचा चित्रपट फ्लॉप ठरल्याने मला वाईट वाटले होते. Read More : Jhalak Dikhhla Jaa 9: ‘या’ दोघांशिवाय हृतिक रोशन डान्सर बनूच शकला नसता!



टीव्हीने मला नवी ओळख मिळवून दिली आहे. तेथे काम करणे आरामदायी आहे, टीव्हीला मी मातेसमान मानतो. टीव्हीने मला नवे जीवनदान दिले आहे, मात्र आज टीव्हीवरून प्रसारित होणारे शो त्या दर्जाचे नाहीत. ९४ % मालिकांचे कंटेट खराब आहेत. त्यात मला काम करावेसे वाटत नाही. यामुळे मी चांगल्या मालिका आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही रोनित रॉय म्हणाला. 

ALSO READ 
अंधांच्या भूमिकेवर खेळले हे हिरो ‘आंधळी’
​दंगलचा खलनायक दिसणार आता काबिल चित्रपटात
 

Web Title: 'Kabil' villain was in the dark when Hrithik's bodyguard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.