‘काबील’ची मुसंडी; कमावले १८.६७ कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 17:57 IST2017-01-27T12:27:53+5:302017-01-27T17:57:53+5:30

परस्परांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या एका अंध जोडप्याची लव्हस्टोरी ‘काबील’ या चित्रपटाच्या रूपाने चित्रपटगृहांत प्रदर्शित झालीय. शांततेत आयुष्य जगू इच्छिणा-या ...

'Kabil' rush; 18.67 crore earned! | ‘काबील’ची मुसंडी; कमावले १८.६७ कोटी!

‘काबील’ची मुसंडी; कमावले १८.६७ कोटी!

स्परांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या एका अंध जोडप्याची लव्हस्टोरी ‘काबील’ या चित्रपटाच्या रूपाने चित्रपटगृहांत प्रदर्शित झालीय. शांततेत आयुष्य जगू इच्छिणा-या या जोडप्याच्या आयुष्यात अचानक वादळ येते आणि या जोडप्याचे प्रेमविश्व उद्वस्त करून जाते. येथून सुरू होते, एका सूडाची कहानी. हृतिक रोशने ‘काबील’मध्ये साकारलेल्या रोहन भटनागरच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे. बॉक्सआॅफिसवरही या चित्रपटाची चांगली घोडदौड सुरु आहे. १०.४३च्या अ‍ॅवरेज ओपनिंगनंतर ‘काबील’ने बॉक्सआॅफिसवर चांगली कमाई केली. दुसºया दिवशीही अपेक्षेनुसार ‘काबील’च्या कमाईत मोठी वाढ झाली. 
रिलीजच्या दुसºयादिवशी या चित्रपटाने १८.६७ कोटी रूपयांचा गल्ला जमवला.  आत्तापर्यंत चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर एकूण २९.१० कोटी रूपयांची कमाई केली आहे. 

राकेश रोशन निर्मित या चित्रपटात हृतिक रोशन आणि यामी गौतम यांच्या ‘काबील’ने ओपनिंग डे म्हणजे २५ तारखेला १०.४३ कोटी रूपयांची कमाई केली.  ‘काबील’ हा देशभरातील ४० टक्के सिनेमागृहांत प्रदर्शित झाला आहे. २६ जानेवारीला  ‘काबील’ने बॉक्सआॅफिसवर मोठी झेप घेत, १८.६७ कोटी कमावले.  ‘काबील’मधील हृतिकचा परफॉर्मन्स हा आत्तापर्यंतच्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक बेस्ट परफॉर्मन्स असल्याचे म्हटले जातेय.

ALSO READ : काबील या चित्रपटातील हृतिक रोशनच्या भूमिकेचे करण जोहरने केले कौतुक
Kaabil movie review : हृतिक रोशन तारीफ के 'काबिल'

ट्रेड गुरुंच्या मते, हृतिकचे चाहते त्याचा हा बेस्ट परफॉर्मन्स पाहण्यास उत्सूक आहे. याचमुळे  ‘काबील’च्या येत्या दिवसांतील कलेक्शनमध्ये चांगली भर पडणार असल्याचा अंदाज आहे. काबिल ही गोष्ट आहे रोहन (हृतिक रोशन) आणि सुप्रिया (यामी गौतम) यांची. अंधत्व हे आपल्या आयुष्यातील कमतरता नाही यावर या दोघांचाही विश्वास असतो. मैत्री, लग्न आणि स्वप्नवत संसार असे सर्व काही चांगले चालत असताना त्यांच्या आयुष्यात अचानक एक वेगळे वळण येते.

Web Title: 'Kabil' rush; 18.67 crore earned!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.