​‘हे’ आहे जस्टीन बीबर व सलमान खानचे ‘शेरा कनेक्शन’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2017 14:13 IST2017-05-11T08:43:19+5:302017-05-11T14:13:19+5:30

काल मुंबईत पॉप सिंगर जस्टीन बीबरचे कॉन्सर्ट पार पडले. यावेळी जस्टीनच्या सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबई पोलिसच ...

'This' is Justin Bieber and Salman Khan's 'Sherra Connection' !! | ​‘हे’ आहे जस्टीन बीबर व सलमान खानचे ‘शेरा कनेक्शन’!!

​‘हे’ आहे जस्टीन बीबर व सलमान खानचे ‘शेरा कनेक्शन’!!

ल मुंबईत पॉप सिंगर जस्टीन बीबरचे कॉन्सर्ट पार पडले. यावेळी जस्टीनच्या सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबई पोलिसच नाही तर  त्याला प्रायव्हेट सिक्युरिटीही पुरवली गेली होती. यादरम्यान सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा पूर्णवेळ जस्टीनच्या पाठीशी दिला. अगदी जस्टीन मुंबई विमानतळावर उतरल्यापासून तो कॉन्सर्टस्थळी जाईलपर्यंत शेरा त्याच्यासोबत होता. खरे तर सलमानला सोडून शेरा जस्टीनच्या मागे मागे फिरतोय, ही गोष्ट अनेकांच्या पचनी पडली नाही. शेरा अखेर जस्टीनच्या सुरक्षेत कसा काय तैनात झाला, हा प्रश्नही अनेकांना पडला होता. सलमानच्या म्हणण्यानुसार तर शेरा गेला नाही ना? अखेर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत.



होय, अखेर जस्टीन आणि सलमानचे कनेक्शन काय ते कळून चुकले आहे. जस्टीन सलमानचा चांगला मित्र आहे. सलमाननेच शेराला जस्टीनच्या सुरक्षेत तैनात केले, अशीच आत्ताआत्तापर्यंत चर्चा होती. पण असे काहीही नाहीय. जस्टीन सलमानचा चांगला मित्र आहे, हे खरे आहे. पण म्हणून त्याने शेराला जस्टीनच्या सुरक्षेसाठी दिले, हे चूक आहे. होय,  सलमानला गार्ड करण्यासोबतच शेराचे एक स्वत:चे सिक्युरिटी फर्म आहे. अनेकांप्रमाणे शेराने सुद्धा जस्टीनच्या सुरक्षेचा जिम्मा उचलण्याचे टेंडर भरले होते. शेराच्या कंपनीचे प्रोफाईल चेक केले असता, जस्टीनच्या सुरक्षेसाठी त्याच्याइतकी लायक सुरक्षा कंपनी दुसरी कुठलीच नाही, हे आयोजकांना कळले आणि मग जस्टीनच्या सुरक्षेत शेरा तैनात झाला. 
शेराच्या सिक्युरिटी एजन्सीने आत्तापर्यंत विल स्मिथ, जॅकी चॅन, मायकल जॅक्सन आदींना भारतात सुरक्षा पुरवली आहे. शेराचे पूर्ण नाव गुरमती सिंह जॉली आहे आणि गत २० वर्षांपासून तो सलमानचा बॉडीगार्ड तैनात आहे.

Web Title: 'This' is Justin Bieber and Salman Khan's 'Sherra Connection' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.