शाहरुख खानसोबत जमणार राणी पद्मावतीची जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 15:41 IST2017-10-18T10:11:32+5:302017-10-18T15:41:32+5:30

आनंद एल राव यांनी रांझणा आणि तन्नू वेडस मन्नुसारखे चित्रपटांचे दिग्दर्शित केले आहे. आनंद एल राव सध्या शाहरुखला घेऊन ...

Junket Rani Padmavati pairing with Shah Rukh Khan | शाहरुख खानसोबत जमणार राणी पद्मावतीची जोडी

शाहरुख खानसोबत जमणार राणी पद्मावतीची जोडी

ंद एल राव यांनी रांझणा आणि तन्नू वेडस मन्नुसारखे चित्रपटांचे दिग्दर्शित केले आहे. आनंद एल राव सध्या शाहरुखला घेऊन चित्रपट तयार करत आहेत. या चित्रपटात शाहरुख आपल्या २५ कारकिर्दीत पहिल्यांदा बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारतो आहे. २०१८ मध्ये हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात शाहरुखच्या विरोधात कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा असणार आहेत. पण या दोघी बरोबर अजून काही अभिनेत्रीचे नाव या चित्रपटासाठी घेतले जाते. यात राणी पद्मावतीच्या नावाची देखील चर्चा आहे, अर्थात दीपिका पादुकोण. कारण कॅटरिना आणि अनुष्काबरोबर दीपिकानेसुद्धा या चित्रपटासाठी स्क्रिन टेस्ट दिली होती. दीपिका शिवाय राणी मुखर्जी, आलिया भट्ट, करिश्मा कपूर, श्रीदेवी आणि काजोलशीसुद्धा बोलणी सुरु आहे.

कदाचित शाहरुख खान पुन्हा एकदा ओम शांति ओम  चित्रपटांची जादू चालवायला बघतायेत. यात दीवानगी- दीवानगी या गाण्यात अनेक कलाकार दिसेल होते. वेळेसोबत या गोष्टीवरुन देखील पडद्या उठलेच की शेवटी ऐवढ्या सगळ्या अभिनेत्रींना चित्रपटातील एक गाण्यासाठी बोलवण्यात आले की आणखीन काही.    
आपला आगामी चित्रपट पद्मावतीच्या प्रमोशनच्या वेळी आली होती त्यावेळी दीपिकाने सांगितले कि मला शाहरुख खानचा फोन आला होता. दीपिका पद्मावतीमध्ये राणी पद्मावतीच्या भूमिकेत दिसणार आहे.दीपिकाच्या या लूकचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे तिने या लूकमध्ये तब्बल २० किलोचे दागिने अंगावर चढविले आहेत. त्याचबरोबर तिने जे कपडे घातलेले आहेत, तेदेखील खूप वजनदार आहेत. या लूकमध्ये येण्यासाठी दीपिकाला कमीत कमी एक तास लागायचा. दीपिकाशिवाय यात चित्रपटात शाहिद कपूर सुद्धा आहे. जो यात  राणी पद्मावतीचा पती चित्तौडचा राजा रावल रत्न सिंगचा भूमिकेत झळकणार आहे. त्याचबरोबर रणवीर सिंगअल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत झळकणार आहे. रणवीर सिंग या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला १ डिसेंबर २०१७ रोजी येणार आहे. हा संजय लीला भन्साळी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या चित्रपट आधी नोव्हेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता.

Web Title: Junket Rani Padmavati pairing with Shah Rukh Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.