वाढदिवशी ज्यूनियर एनटीआरने चाहत्यांना दिले रिटर्न गिफ्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2018 16:46 IST2018-05-20T11:14:56+5:302018-05-20T16:46:42+5:30
साउथचा सुपरस्टार ज्यूनियर एनटीआर आज त्याचा ३५वा वाढदिवस साजरा करीत आहे. वाढदिवसाच्या खास क्षणी त्याने आपल्या चाहत्यांना रिटर्न गिफ्ट ...

वाढदिवशी ज्यूनियर एनटीआरने चाहत्यांना दिले रिटर्न गिफ्ट!
स उथचा सुपरस्टार ज्यूनियर एनटीआर आज त्याचा ३५वा वाढदिवस साजरा करीत आहे. वाढदिवसाच्या खास क्षणी त्याने आपल्या चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिले आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले असून, त्यामध्ये तो अतिशय धाडसी अंदाजात बघावयास मिळत आहे. ज्यूनियर एनटीआरच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘अरविंद सामेथा’ असे आहे.
‘अरविंद सामेथा’च्या निर्मात्यांनी ज्यूनियर एनटीआरच्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे. ‘अरविंद सामेथा’च्या या पोस्टरमध्ये ज्यूनियर एनटीआर एकदम हटके अंदाजात बघावयास मिळत आहे. पोस्टरमध्ये तो शर्टलेस लूकमध्ये आहे. पोस्टरमध्ये त्याची बॉडी बघून चाहत्यांनाही धक्का बसला आहे. कारण त्याचा हा लूक बघून कोणीही सांगू शकेल की, या चित्रपटातील पात्र साकारण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे.
![]()
असे सांगितले जात आहे की, चित्रपटातील काही दृश्यासाठी ज्यूनियर एनटीआरने ४३ डिग्री तपमानात शूटिंग केली आहे. प्रसिद्धी झालेल्या बातम्यांनुसार, या चित्रपटात ज्यूनियर एनटीआरसोबत अभिनेत्री पूजा हेगडे बघावयास मिळणार आहे. ‘अरविंद सामेथा’ या चित्रपटाला राधा कृष्णा यांनी प्रोड्यूस केले आहे. दरम्यान, चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आल्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.