​ज्युनिअर एनटीआर पुन्हा एकदा झाला बाबा, पत्नीने दिला मुलाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 20:17 IST2018-06-14T13:10:59+5:302018-06-14T20:17:22+5:30

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर पुन्हा एकदा बाबा झाला आहे. होय, ज्युनिअर एनटीआरची पत्नी लक्ष्मी प्रनथी हिने एका गोंडस ...

Junior NTR again once again, the wife gave birth to the child | ​ज्युनिअर एनटीआर पुन्हा एकदा झाला बाबा, पत्नीने दिला मुलाला जन्म

​ज्युनिअर एनटीआर पुन्हा एकदा झाला बाबा, पत्नीने दिला मुलाला जन्म

क्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर पुन्हा एकदा बाबा झाला आहे. होय, ज्युनिअर एनटीआरची पत्नी लक्ष्मी प्रनथी हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ज्युनिअर एनटीआरला आधीचा एक मुलगा आहे. त्याचे नाव अभय राम आहे. ज्युनिअर एनटीआरने ट्विट करून ही गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली. ‘कुटुंब वाढले आहे, मुलगा झालायं,’ असे ट्विट त्याने केले. ज्युनिअर एनटीआर हा गतकाळातील प्रसिद्ध अभिनेते आणि आंध्रचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचा नातू आहे. त्यांच्या वडिलांचे नाव नंदमूरी हरिकृष्ण आहे. ज्युनिअर एनटीआर हा त्यांचा दुस-या पत्नीपासून झालेला मुलगा आहे.



ज्युनिअर एनटीआर व लक्ष्मी यांचे लग्न 2011 मध्ये झाले होते. त्यांचे हे लग्न बरेच गाजले होते. त्याच्यावरून मोठा गोंधळ झाला होता. 



2010 साली विजयवाडा येथील वकील सिंगुलुरी शांती प्रसाद यांनी ज्युनिअर एनटीआरविरुद्ध चाइल्ड मॅरेज अॅक्टविरुद्ध केस दाखल केली होती. ज्युनिअर एनटीआरची पत्नी लग्नाच्यावेळी केवळ 17 वर्षाची आहे. ती मे 2011मध्ये 18 वर्षाची होणार होती, असे त्यांचे म्हणणे होते. ज्युनिअर एनटीआरने लक्ष्मी प्रनथीसोबत मार्च 2011 साली साखरपुडा केला होता. त्यानंतर त्याने कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी 5 मे 2011 रोजी प्रणितीसोबत विवाह केला.
2009 साली झालेल्या जनरल इलेक्शनमध्ये तेलुगुदेशम पार्टीच्या कॅम्पेनदरम्यान हैदराबादला परतत असताना ज्युनिअर एनटीआरला मोठा अपघात झाला होता. हा अपघात इतका मोठा होता, की त्यावेळी कारमधील लोक बाहेर फेकले गेले होते. या अपघातात ज्युनिअर एनटीआर गंभीर जखमी झाला होता. 
 

Web Title: Junior NTR again once again, the wife gave birth to the child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.