बेजॉयसोबत काम केल्याचा आनंद - आदितीराव हैदरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 21:59 IST2016-02-19T04:59:05+5:302016-02-18T21:59:05+5:30
अभिनेत्री आदितीराव हैदरी म्हणते,‘वझीर’ नंतर पुन्हा एकदा मी बेजॉय नाम्बियारसोबत एका म्युझिक व्हिडीओसाठी काम करत आहे. त्याच्यासोबत काम करण्याचा ...

बेजॉयसोबत काम केल्याचा आनंद - आदितीराव हैदरी
अ िनेत्री आदितीराव हैदरी म्हणते,‘वझीर’ नंतर पुन्हा एकदा मी बेजॉय नाम्बियारसोबत एका म्युझिक व्हिडीओसाठी काम करत आहे. त्याच्यासोबत काम करण्याचा आनंदच काही और आहे. तो खुप जिद्दी असल्याने मला त्याच्यासोबत काम करायला आवडले. कलाकारामध्ये जिद्द ही असलीच पाहिजे. तुम्ही जेव्हा एखादी कलाकृती सादर करणार असता त्यावेळी तुमच्या डोक्यात अगोदर सर्व स्पष्ट हवे की तुम्ही काय करणार आहात. आमच्या क्षेत्रात लोक खुप सांगतात की, तू हे कर, तू ते कर . पण स्वत:च्या मनाने काम करणे यातच तर खरी मजा आणि आनंद आहे. अशा दिग्दर्शकांतर्गत काम करायचे म्हणजे आपलाही आत्मविश्वास साहजिकच वाढणार आहे. ’