रितेश नव्हे तर जॉन करतोय जेनेलियाला मिस... का येतेय जॉनला जेनेलियाची आठवण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 11:01 IST2016-11-10T21:30:18+5:302016-11-11T11:01:11+5:30
हे गाणे परफेक्ट रोमाँटिक साँग आहे

रितेश नव्हे तर जॉन करतोय जेनेलियाला मिस... का येतेय जॉनला जेनेलियाची आठवण?
या गाण्यात दोघांची केमिस्ट्री चांगलीच जुळून आली आहे. गाण्याची सुरुवात एका चर्चमधून होते. जॉन आपल्या पत्नीच्या आठवण करताना दिसतोय. आपल्या पत्नीसोबत घालविलेल्या क्षणांची तो आठवण करतो आहे. तर सोनाक्षी जॉनच्या प्रेमात असल्याचे दिसते. तिच्या आठवणीत असताना तो हे गाणे अरमान मलिकने गायले असून संगीत अमाल मलिक यांने दिले आहे. हे गाणे परफेक्ट रोमाँटिक साँग आहे. आतापर्यंत फोर्सच्या प्रचारादरम्यान जेनेलियाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. यामुळे हा चित्रपटात केवळ सोनाक्षी सिन्हा दिसेल असेच सर्वांना वाटत होते. मात्र जेनेलिया डिसूझा देखील यात दिसणार असल्याने तिच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
‘फोर्स 2’ हा चित्रपट 2009 साली आलेल्या ‘फोर्स’चा सिक्वल असून यात जॉन अब्राहम दहशतवाद्याचा खात्मा करताना दिसणार आहे. ‘फोर्स’ हा चित्रपट हिट ठरला होता. यात जॉन व जेनेलियाची जबरदस्त केमिस्ट्री पहायला मिळाली होती. ‘फोर्स 2’या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू असून लवकरचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.