​जॉन अब्राहमचा धमाका! सहा चित्रपटांसाठी केला करार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2017 18:09 IST2017-01-31T12:37:56+5:302017-01-31T18:09:04+5:30

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन स्टार जॉन अब्राहम गतवर्षी एका मराठी चित्रपटाच्या लॉन्चिंगला पोहोचला होता. यावेळी मी मराठी चित्रपट करणार, असे वचन ...

John Abraham's explosion! Controversy for six films !! | ​जॉन अब्राहमचा धमाका! सहा चित्रपटांसाठी केला करार!!

​जॉन अब्राहमचा धमाका! सहा चित्रपटांसाठी केला करार!!

लिवूडचा अ‍ॅक्शन स्टार जॉन अब्राहम गतवर्षी एका मराठी चित्रपटाच्या लॉन्चिंगला पोहोचला होता. यावेळी मी मराठी चित्रपट करणार, असे वचन त्याने आपल्या चाहत्यांना दिले होते. यावर्षी जॉनने हे वचन अखेर पूर्ण केले. होय, जॉनने एक मोठा करार केला आहे. या कराराअंतर्गत तो मराठीसह सहा चित्रपटांची निर्मिती  करणार आहे.
अक्षय कुमारसोबत ‘रूस्तम’ हा चित्रपट बनवणाºया एंटरटेनमेंट कंपनीने जॉनसोबत हा करार केला आहे. याअंतर्गत ही कंपनी जॉनसोबत हिंदीचे तीन तसेच गुजराती, मल्याळम व मराठी असे सहा सिनेमे बनवणार आहे. तीन पैकी दोन हिंदी चित्रपटांत जॉन अ‍ॅक्टिंग करताना  दिसणार आहे.  यापैकी पहिला चित्रपट अ‍ॅक्शन-थ्रीलर असणार आहे. मात्र मराठी चित्रपटात तो अ‍ॅक्टिंग करणार वा नाही, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. गतवर्षी जॉन ‘फुगे’ या मराठी चित्रपटाच्या लॉन्चिंगला पोहोचला होता. यावेळी जॉनने आपल्या चाहत्यांसोबत मराठीत संवाद साधला होता. मला मराठी बोलता येते. पण फार नाही. मी लवकरच एक मराठी चित्रपट घेऊन येणार आहे. स्वप्ना वाघमारे ही या चित्रपटाची दिग्दर्शक असेल, असे त्याने सांगितले होते. यावर्षी मार्चपर्यंत जॉनचा मराठी चित्रपट फ्लोरवर येईल, अशी अपेक्षा आहे. आता या मराठी चित्रपटात अ‍ॅक्शन स्टार जॉन कुठल्या भूमिकेत दिसतो, ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. खरे तर मराठी चित्रपटात जॉनचा अभिनय पाहण्यासाठी त्याचे मराठी चाहते उत्सूक आहेत. 

also read: पाहा : अशी आहे जॉन अब्राहमची २ कोटी किमतीची ‘गॉडजिला’!
लोक केवळ माझ्या शरीराकडे लक्ष देतात; जॉन अब्राहमची खंत

सध्या जॉनचे फिल्मी करिअर फारसे समाधानकारक नाही. त्याचा अलीकडे येऊन गेलेला ‘ढिशूम’ हा सिनेमा बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला होता. त्यामुळे आता जॉन दमदार वापसी करू इच्छितो. आता आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली जॉन किती यशस्वी ठरतो, ते बघूच!


 
 

Web Title: John Abraham's explosion! Controversy for six films !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.