​ जॉन अब्राहमच्या ‘परमाणु : द स्टोरी आॅफ पोखरण’चा फर्स्ट लूक आला!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2017 06:23 AM2017-06-22T06:23:41+5:302017-06-22T11:54:30+5:30

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो जॉन अब्राहमचा ‘परमाणु : द स्टोरी आॅफ पोखरण’ हा चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. आज या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला.

John Abraham's Atom: The Story of Pokhran's First Look! | ​ जॉन अब्राहमच्या ‘परमाणु : द स्टोरी आॅफ पोखरण’चा फर्स्ट लूक आला!

​ जॉन अब्राहमच्या ‘परमाणु : द स्टोरी आॅफ पोखरण’चा फर्स्ट लूक आला!

googlenewsNext
लिवूडचा अ‍ॅक्शन हिरो जॉन अब्राहमचा ‘परमाणु : द स्टोरी आॅफ पोखरण’ हा चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. आज या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला. जॉनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फर्स्ट लूक पोस्ट केला आहे. या पोस्टरमध्ये जॉनचा चेहरा दिसतोय आणि सोबतच पोखरणच्या नकाशाची एक झक़
११ आणि १३ मे १९९८ रोजी पोखरण येथे झालेल्या आण्विक चाचण्यांच्या स्मृती ताज्या करणाºया या चित्रपटात जॉन अब्राहम, डायना पेन्टी आणि बोमन इराणी अशी स्टारकास्ट आहे. अभिषेक शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे, सैविन कदरोस आणि संयुक्ता चावला शेख यांनी. या दोघांनी याआधी ‘नीरजा’ची पटकथा लिहिली होती.
 


मुंबई व दिल्लीत सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. जॉनने या चित्रपटाबद्दल सांगितले की, या चित्रपटात प्रेक्षकांना १९९८ मध्ये झालेल्या अणू चाचण्यांची कथा बघायला मिळेल. या मोहिमेसाठी लष्कर, शास्त्रज्ञ, अभियंते, सॅटेलाईट एक्सपर्ट असे सगळे एकत्र आले होते. ११ मे १९९८ रोजी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी राजस्थानातील पोखरण येथे एकाच वेळी ३ अणुस्फोट घडवून आणलेत गेले होते. यानंतर १३ मे १९९८ रोजी पुन्हा दोन अणुस्फोट घडवून आणले गेले होते. यास ‘आॅपरेशन शक्ती’ या नावाने ओळखले जाते. या चाचण्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या देखरेखीखाली झाल्या होत्या.
भारताने अलिप्तवादी धोरणाचा स्वीकार केला. जगात शांतता निर्माण व्हावी यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील आहोत. मात्र १९६२ च्या चीन आक्रमणानंतर भारताने लष्करीदृष्ट्या सक्षम होण्यासाठी, आपली संरक्षणसिद्धता जगाला दर्शविण्यासाठी १९७४ व १९९८ मध्ये पोखरण येथे अणुचाचण्या केल्या होत्या.

Web Title: John Abraham's Atom: The Story of Pokhran's First Look!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.