खुल्या जीपमध्ये ‘या’ अभिनेत्रीसोबत फिरताना दिसला जॉन अब्राहम; व्हिडीओ झाला व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 15:44 IST2018-05-23T10:13:51+5:302018-05-23T15:44:14+5:30
जॉन अब्राहम सध्या त्याच्या आगामी ‘परमाणू’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकताच तो दिल्लीतील रस्त्यावर खुल्या जीपमधून फेरफटका मारताना दिसला.

खुल्या जीपमध्ये ‘या’ अभिनेत्रीसोबत फिरताना दिसला जॉन अब्राहम; व्हिडीओ झाला व्हायरल!
ब लिवूड अभिनेता जॉन अब्राहमच्या आगामी ‘परमाणू’ या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये जबरदस्त उत्सुकता बघावयास मिळत आहे. आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखला जाणारा जॉन त्याच्या आगामी चित्रपटात नव्या लूकमध्ये बघावयास मिळणार आहे. सध्या या चित्रपटाशी संबंधित त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये तो दिल्लीच्या रस्त्यांवर खुल्या जीपमध्ये फिरताना दिसत आहे. जॉनला अशा अंदाजात बघून चाहते त्याचे मागे धावत असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र सर्वात सस्पेन्सवाली बाब ही होती की, जीपमध्ये त्याच्यासोबत बसलेली ती अभिनेत्री अखेर कोण होती? जेव्हा जीपच्या मागे पळणाºया चाहत्यांनी तिला आवाज दिला तेव्हा तिने मागे वळून बघितले.
कारण ती अभिनेत्री ‘परमाणू’मध्ये असलेली जॉनची सहअभिनेत्री डायना पेंटी होती. जॉन काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये बघावयास मिळाला. तर डायना आर्मी लूकमध्ये दिसून आली. दिल्लीमध्ये आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोघांनीही परमाणू प्राइड परेड काढली होती. दिल्लीतील सर्वात प्रमुख कनॉट प्लेसमध्ये दोघांनी खुल्या जीपमध्ये बसून फेरफटका मारला. जॉनने ट्विट करून याविषयी माहिती चाहत्यांना दिली. दरम्यान, हा चित्रपट बमन ईरानी आणि अभिषेक शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपट सत्यघटनेवर आधारित असून, यातील पात्र काल्पनिक आहेत.
कृअर्ज एंटरटेनमेंटच्या प्रेरणा अरोरा आणि अर्जुन एन. कपूर यांनी सांगितले की, आम्हाला या चित्रपटाच्या माध्यमातून ‘जय जवान जय विज्ञान’ या नारा द्यायचा आहे. ‘परमाणू’च्या माध्यमातून एका पडद्यामागे गेलेल्या देशातील हिरोला पुढे आणण्याचा आमचा उद्देश आहे. ‘रुस्तम’ आणि ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटानंतर हा चित्रपट केवळ मनोरंजनाच्या उद्देशानेच बनविण्यात आला नसून, त्यामध्ये देशावर गर्व वाटेल अशी गोष्ट दाखविली जाणारी आहे. दरम्यान, हा थ्रिलर चित्रपट २५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.