तर या तारखेला रिलीज होणार करण जोहरचा 'स्टुडंट ऑफ द इयर 2'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 10:48 IST2018-01-25T05:18:40+5:302018-01-25T10:48:40+5:30

करण जोहर दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होता. या चित्रपटाच्या यशानंतर करणने ...

Johar's 'Student of the Year 2' will be released on this date. | तर या तारखेला रिलीज होणार करण जोहरचा 'स्टुडंट ऑफ द इयर 2'

तर या तारखेला रिलीज होणार करण जोहरचा 'स्टुडंट ऑफ द इयर 2'

ण जोहर दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होता. या चित्रपटाच्या यशानंतर करणने 'स्टुडंट ऑफ द इयर 2' ची घोषणा केली. मात्र त्यानंतर तो प्रोजेक्ट काहीसा थंड झाला. शेवटी गतवर्षी करणने या चित्रपटाचा पहिला लूक रिलीज केला.  

जे फॅन्स या चित्रपटाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी एक खूशखबर आहे. करणने सोशल मीडियावर या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. 23 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच बरोबर चित्रपटातील एक नवे पोस्टर करण जोहरने रिलीज केले आहे. यात टायगर श्रॉफ पोस्टरमध्ये सिक्स पॅक दाखवताना दिसतो आहे त्याच्या हातात एक बॅगसुद्धा दिसते आहे.  

याच बरोबर करण जोहरने सांगितले आहे की पुढच्या महिन्यात तुम्हाला कळेल की यात टायगरसोबत कोण दोन अभिनेत्री झळकणार आहेत. 'स्टुडंट ऑफ द इयर 2' चे दिग्दर्शन करण जोहर नाही तर पुनीत मल्होत्रा करणार आहे. पुनीतने याआधा 'गोरी तेरे प्यार मैं' आणि 'आय हेट लव्ह स्टोरीज' सारखे चित्रपट तयार केले आहे. 
  2012मध्ये आलेल्या 'स्टुडंट ऑफ द इयर' प्रमाणे 'स्टुडंट ऑफ द इयर 2' पण प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. मिळालेल्या माहितीनुसार यातून चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेला लाँच करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 'मिस वर्ल्ड 2017' मानुषी छिल्लर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. मात्र करणने या गोष्टी केवळ अफवा असल्याचे सांगत फेटाळल्या.   
'स्टुडंट ऑफ द इयर 2'च्या आधी 'बागी 2' रिलीज होणार आहे. 'बागी 2'  टायगर व दिशाची लव्हस्टोरी कॉलेजपासून सुरु होते. पण दिशाचे टायगरऐवजी दुसºया तरूणासोबत विवाह होतो. मध्यंतरानंतर दिशाच्या पतीचा मृत्यू होतो. तिचीही हत्या होते आणि तिच्या मुलाचे अपहरण केले जाते. यानंतर टायगर या मुलाला वाचवतो. 

Web Title: Johar's 'Student of the Year 2' will be released on this date.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.