​जान्हवी कपूर, सारा अली खानपेक्षा कमी नाही अनु मलिकची मुलगी अदा मलिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2017 11:41 IST2017-05-12T06:11:07+5:302017-05-12T11:41:07+5:30

जस्टीन बीबरच्या नुकत्याच झालेल्या कॉन्सर्टमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी पोहोचले. बॉलिवूड सिंगर अनु मलिक हेही यावेळी दिसले. अनु मलिकसोबत दिसली ...

Jinnahvi Kapoor, Sara Ali Khan, Anu Malik's daughter Ada Malik! | ​जान्हवी कपूर, सारा अली खानपेक्षा कमी नाही अनु मलिकची मुलगी अदा मलिक!

​जान्हवी कपूर, सारा अली खानपेक्षा कमी नाही अनु मलिकची मुलगी अदा मलिक!

्टीन बीबरच्या नुकत्याच झालेल्या कॉन्सर्टमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी पोहोचले. बॉलिवूड सिंगर अनु मलिक हेही यावेळी दिसले. अनु मलिकसोबत दिसली ती बार्बी डॉल. आश्चर्य वाटले ना. ही बार्बी डॉल दुसरी कुणी नसून होती, अनु मलकी यांची लाडकी लेक अदा मलिक़ होय, अदा इतकी स्टाईलिश आहे की, ती आली ना आली,सगळ्या मीडियाचे लक्ष तिने वेधून घेतले. मग काय, उत्तम  ‘पोजर’ असलेल्या अदाने मीडियाचे हे अटेंशन जाम एन्जॉय केले. आपल्या आगळ्या-वेगळ्या स्टाईलसह ती कॅमे-यांपुढे पोज देतांना दिसली. पापाचा हात पकडलेली अदा कुठल्याही प्रिन्सेसपेक्षा कमी दिसत नव्हती.





अदा अनेकदा तिच्या पापासोबत दिसली आहे. अनु मलिक यांना दोन मुली आहेत. अनमोल आणि अदा अशी या दोघींची नावे. पित्याच्या वाटेवर चालत अनु मलिक यांची मोठी मुलगी अनमोल हिने संगीत हे आपले प्रोफेशन म्हणून स्वीकारले आहे. याऊलट अनु मलिक यांची लहान मुलगी अदा हिची रूची फॅशन इंडस्ट्रीत आहे.




२१ वर्षीय अदा फॅशन इंडस्ट्रीत आपले नशीब आजमावत आहे. न्यूयॉर्कच्या पर्सन स्कूल डिजाईनमधून तिने फॅशन डिझाईनिंगचा कोर्स केला आहे.
गतवर्षी न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये तिने आपले डिझाईन्स सादर केले होते. तिच्या या सादरीकरणाची बरीच प्रशंसा झाली होती.



बॉलिवूडच्या पॉप्युलर डॉटर्सपैकी एक असलेली अदा सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. लाईफ, व्हॅकेशन आणि फॅशनशी संबंधित अनेक गोष्टी ती आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर करत असते. एकंदर काय तर, जान्हवी कपूर, सारा अली खान, नव्या नवेली अशा स्टार्स डॉटर्सपेक्षा अदा जराही कमी नाही. विश्वास बसत नसेल तर तिच्या काही फोटोंवर नजर टाका!!

Web Title: Jinnahvi Kapoor, Sara Ali Khan, Anu Malik's daughter Ada Malik!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.