जान्हवी कपूरची फेव्हरेट अभिनेत्री मॉम श्रीदेवी नव्हे तर ‘ही’ अभिनेत्री आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 21:42 IST2018-05-30T15:30:58+5:302018-05-30T21:42:42+5:30

जबरदस्त ड्रेसिंग आणि स्टाइलची मल्लिका राहिलेली दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीने मुलगी जान्हवीला आपल्या चेहºयावर काहीही न लावण्याचा सल्ला दिला होता. ...

Jhanvi Kapoor's Favorite Actress, Mom Sridevi, is 'This' Actress! | जान्हवी कपूरची फेव्हरेट अभिनेत्री मॉम श्रीदेवी नव्हे तर ‘ही’ अभिनेत्री आहे!

जान्हवी कपूरची फेव्हरेट अभिनेत्री मॉम श्रीदेवी नव्हे तर ‘ही’ अभिनेत्री आहे!

रदस्त ड्रेसिंग आणि स्टाइलची मल्लिका राहिलेली दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीने मुलगी जान्हवीला आपल्या चेहºयावर काहीही न लावण्याचा सल्ला दिला होता. लेक जान्हवीच्या पहिल्या ‘धडक’ या चित्रपटाबद्दल ती खूपच आनंदी होती. ‘धडक’चा निर्माता करण जोहरने वोग इंडियाच्या जूनच्या अंकासाठी जान्हवीने दिलेल्या मुलाखतीत तिच्याशी चर्चा केली. त्याने जान्हवीला विचारले की, जेव्हा श्रीदेवी यांनी चित्रपटातील २५ मिनिटांचे फुटेज बघितले तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती? त्यावर जान्हवीने म्हटले की, ‘ती यावरून खूपच निवडक होती. सर्वात अगोदर तिने मला सांगितले की, सुधारणेची गरज आहे. तिला याची जाणीव झाली की, मस्करा अर्धवट असून, त्यावरून ती खूपच त्रस्त आहे.’

पुढे बोलताना जान्हवीने सांगितले की, ‘दुसरे तिने मला सांगितले की, तू चेहºयावर काहीही लावू नकोस. हे सर्व सांगताना तिच्या चेहºयावर एक वेगळाच आनंद होता. यावेळी जेव्हा जान्हवीला तिच्या फेव्हरेट कलाकारांविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने, ‘धडक’मधील सहकलाकारांचे कौतुक केले. त्याचबरोबर राजकुमार राव, धनुष आणि नवाजुद्दीन सिद्दीकी या कलाकारांचे नाव घेताना, या सर्वांचा मला अभिनय आवडत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर ‘मी त्याच कलाकारांकडे आकर्षित होते, जे मला मोहात पाडतात. माझ्यासाठी हे सर्व कलाकार खूपच आदर्श आहेत. 



यावेळी जान्हवीने तिची फेव्हरेट अभिनेत्री आलिया भट्ट असल्याचे सांगितले. दरम्यान, यावेळी जान्हवीने वोग साप्ताहिकासाठी पहिले फोटोशूट केले. या फोटोंमध्ये ती खूपच गॉर्जियस दिसत होती. तिच्या या फोटोशूटमधील काही फोटोज् सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जान्हवीच्या चाहत्यांकडून त्यास चांगली पसंतीही दिली जात आहे. 

Web Title: Jhanvi Kapoor's Favorite Actress, Mom Sridevi, is 'This' Actress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.