शाहरुख खानचा 'जवान' लवकरच करणार ६०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री, जाणून घ्या आतापर्यंतची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 02:57 PM2023-09-30T14:57:00+5:302023-09-30T15:07:37+5:30

६०० कोटींचा टप्पा पार करण्याच्या दिशेने जवानची वाटचाल सुरु आहे.

jawan box office collection day 24 shah rukh khan film may earn 8 to 9 crores on fourth saturday very close to cross 600 crores | शाहरुख खानचा 'जवान' लवकरच करणार ६०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री, जाणून घ्या आतापर्यंतची कमाई

शाहरुख खानचा 'जवान' लवकरच करणार ६०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री, जाणून घ्या आतापर्यंतची कमाई

googlenewsNext

शाहरुख खान (Shah Rukh Khan) स्टारर 'जवान' (Jawan Movie) हा चित्रपट देश-विदेशात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ५५० कोटींहून अधिक कमाई केली आहे आणि आता तो ६०० कोटींचा टप्पा पार करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. वर्ल्डवाइड या चित्रपटाने अलीकडेच १००० कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि तो आता जगभरातील हिंदी चित्रपटातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. आता जवानचे २३ व्या दिवशीचे कलेक्शन समोर आलं आहे. 

'जवान' हा शाहरुख खानच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. मात्र, आता चित्रपटाच्या कमाईत घट होत आहे. पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 389.99 कोटींचा गल्ला जमावला. दुसऱ्या आठवड्यात 136.1 तर तिसऱ्या आठवड्यात  55.92 कोटींची कमाई केली. आता सिनेमाने चौथ्या आठड्यात एंट्री केली आहे.


बॉक्सऑफिस ट्रॅकर सचनिकच्या रिपोर्टनुसार २३ व्या दिवशी जवानने 5.13 कोटींची कमाई केली आहे तर २४ व्या दिवशी 'जवान' 8.50 कोटींची कमाई करेल असा अंदाज आहे. यानंतर सिनेमाच्या ऐकूण कमाई 595.53 कोटींच्या घरात असेल. त्यामुळे 'जवान' लवकरच 600 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करेल. 'द व्हॅक्सिन वॉर' आणि 'फुकरे ३' थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. अशा परिस्थितीत 'जवान'च्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक अ‍ॅटली कुमारने जवानचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण, नयनतारा, विजय सेतुपथी, सुनिल ग्रोव्हर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

Web Title: jawan box office collection day 24 shah rukh khan film may earn 8 to 9 crores on fourth saturday very close to cross 600 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.