जावेद अख्तर अपसेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:47 IST2016-01-16T01:08:15+5:302016-02-05T13:47:51+5:30
कवितेच्या क्षेत्रात जावेद अख्तर यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांचा कार्यक्रम कुठेही असला तरी, प्रेक्षक प्राण कानात आणून त्यांच्या ...

जावेद अख्तर अपसेट
क ितेच्या क्षेत्रात जावेद अख्तर यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांचा कार्यक्रम कुठेही असला तरी, प्रेक्षक प्राण कानात आणून त्यांच्या शब्दप्रतिभेच्या पावसात चिंब भिजत असतात.
मात्र, दिल्लीत झालेल्या 'दिल्ली काव्य महोत्सवा'मध्ये चाहत्यांना अशा दुर्दैवी अनुभवास सामोरे जावे लागले. मध्येच कार्यक्रम थांबवल्यामुळे खुद्द जावेदसाबदेखील अपसेट झाले.
जावेद अख्तर यांचे व्याख्यान रंगात आले होते. उपस्थितांच्या प्रश्नांना ते मोकळेपणाने उत्तरे देत होते. काही लोक कविता म्हणून दाखवण्याची फर्माईश करीत होते. त्याच वेळी काही स्वयंसेवक श्रोत्यांकडून माईक काढून घेत होते. हे लक्षात आल्यानंतर जावेद अख्तर यांनी 'कविता नंतर कधी तरी,' असे सांगत आटोपते घेण्याचा प्रयत्न केला.