पंजाबच्या महिला आयोगा पाठोपाठ 'या' गायकाने केली हनी सिंगवर कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 14:01 IST2019-07-05T13:15:36+5:302019-07-05T14:01:23+5:30

रॅपर हनी सिंग आणि वाद हे समीकरण तसं जुनं आहे. हनी सिंगच्या अडचणीत दिवसांदिवस वाढ होताना दिसतेय. 'मखना' या गाण्यामुळे हनी सिंग पुन्हा एकदा वादात सापडला आहे

Jasbeer wantend to take legal action on honey singh | पंजाबच्या महिला आयोगा पाठोपाठ 'या' गायकाने केली हनी सिंगवर कारवाईची मागणी

पंजाबच्या महिला आयोगा पाठोपाठ 'या' गायकाने केली हनी सिंगवर कारवाईची मागणी

ठळक मुद्देअधिकाऱ्यांकडून 12 जुलैपर्यंत याबाबतचा रिपोर्ट मागितला आहे

रॅपर हनी सिंग आणि वाद हे समीकरण तसं जुनं आहे. हनी सिंगच्या अडचणीत दिवसांदिवस वाढ होताना दिसतेय. 'मखना' या गाण्यामुळे हनी सिंग पुन्हा एकदा वादात सापडला आहे. या गाण्यात महिलांबाबत अभद्र आणि अशोभनीय शब्द वापरल्याचा आरोप पंजाबच्या महिला आयोगाकडून करण्यात आला आहे. त्यानंतर आता पंजाबी गायक जसबीरने सुद्धा हनी सिंगवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मखना गाण्यामध्ये वापरण्यात आलेल्या शब्दांवर आता जसबीरने देखील आक्षेप घेतला आहे. या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे तसेच कारवाईच करण्यात यावी अशी देखील मागणी केली आहे. 


याआधी पंजाब महिला आयोगाच्या मनीषा गुलाटी यांनी या गाण्याविरोधात FIR दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून 12 जुलैपर्यंत याबाबतचा रिपोर्ट मागितला आहे.  


मनीष यांनी अधिकाऱ्यांना पत्रात लिहिलेले आहे की, ''टी-सिरीजचे चेअरमन भूषण कुमार आणि हनी सिंग यांच्या गाण्यावर कारवाई करण्यात यावी. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या गाण्यात महिलांविषयी अशोभनिय भाषा भाषा वापरली आहे त्यामुळे पोलिसांनी गायकावर आणि संबंधीत कंपनी विरोधात तक्रार दाखल करावी. तसेच त्यांनी या गाण्याला बॅन करण्याची मागणी देखील केली आहे. 

Web Title: Jasbeer wantend to take legal action on honey singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.