जान्हवी कपूरला अमेरिकेत शिक्षण घेतल्याचा होतोय पश्चाताप; म्हणाली, "त्यापेक्षा मी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 07:08 PM2024-02-23T19:08:36+5:302024-02-23T19:09:49+5:30

मी कॅलिफोर्नियामधील अॅक्टिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. पण तिथे...जान्हवीने केला खुलासा

Janhvi Kapoor regrets studying in acting school America says I'd rather study in India | जान्हवी कपूरला अमेरिकेत शिक्षण घेतल्याचा होतोय पश्चाताप; म्हणाली, "त्यापेक्षा मी..."

जान्हवी कपूरला अमेरिकेत शिक्षण घेतल्याचा होतोय पश्चाताप; म्हणाली, "त्यापेक्षा मी..."

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. करण जोहरच्या  'धडक' सिनेमातून तिने पदार्पण केले. सध्या ती आगामी 'देवरा' सिनेमामुळे चर्चेत आहे. हा तिचा पहिलाच साऊथचा सिनेमा आहे. यामध्ये ती ज्युनिअर एनटीआरसोबत स्क्रीन शेअर करत आहे. जान्हवीने अमेरिकेतून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. पण आता तिला याचा पश्चात्ताप होत आहे. तिथे शिक्षण घेण्याचा काहीच फायदा झाला नसल्याचा तिने नुकताच खुलासा केला.

जान्हवी एका मुलाखतीत म्हणाली, "मी कॅलिफोर्नियामधील अॅक्टिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. तिथे मला मजा आली पण अनुभव काही खास नव्हता. तिथला माहोल चांगला होता, मला तिथे मी कोणाची मुलगी आहे असं म्हणून ओळखत नव्हतं. मला असं आयुष्य चांगलं वाटत होतं. मी ज्या स्कूलमध्ये होते त्याचा फॉर्मेट हा हॉलिवूडवर आधारित होता. म्हणजे हॉलिवूडमध्ये कसं काम चालतं, ऑडिशन कसे होतात, कास्टिंगसंबंधी लोकांना कसं भेटायचं असतं, मेथड अॅक्टिंग काय असते यावर ते आधारित होतं. पण मी मेथड अॅक्टर नाही."

ती पुढे म्हणाली, "त्यापेक्षा मी ते वर्ष भारतातच घालवले असते तर बरं झालं असतं. मी आपल्या देशातील गोष्टी सिनेमातून मांडते परदेशातील नाही. अमेरिकेत वेळ घालवण्याऐवजी मी भारतातच राहिले असते, इथल्या भाषा समजून घेतल्या असत्या तर बरं झालं असतं. इथले लोक कशा पद्धतीने विचार करतात हे मी समजून घेतलं असतं."

जान्हवी लवकरच 'उलझ' सिनेमातही दिसणार आहे.यामध्ये ती IFS अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. तसंच राजकुमार रावसोबत तिचा 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमा रिलीज होणार आहे.

Web Title: Janhvi Kapoor regrets studying in acting school America says I'd rather study in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.