काय होतीस तू काय झालीस तू, जान्हवी कपूरची अवस्था बघून चाहते झाले शॉक्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 12:39 PM2021-10-12T12:39:50+5:302021-10-12T12:48:43+5:30

जान्हवी कपूरची कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.

Janhvi Kapoor Left His Fans shocked with Her Unbelievable No Makeup Look | काय होतीस तू काय झालीस तू, जान्हवी कपूरची अवस्था बघून चाहते झाले शॉक्ड

काय होतीस तू काय झालीस तू, जान्हवी कपूरची अवस्था बघून चाहते झाले शॉक्ड

googlenewsNext

ग्लॅमर वर्ल्डमध्ये मेकअप हा तितकाच महत्त्वाचा भाग मानला जातो. अभिनेत्री सतत मेकअपमध्ये वावरताना दिसतात. मात्र आता कामावेळीच मेकअपमध्ये अभिनेत्री दिसतात. एरव्ही त्यांच्या रिकाम्या वेळेत मेकअपविनाच राहणे पसंत करतात.  नेहमीच जान्हवी कपूरचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. सोशल मीडियावर काही फोटो शेअर करताच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग असते.जान्हवीचे चाहते तिच्या अभिनयासोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात.विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमेऱ्या त कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.

मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या जान्हवीच्या फोटोमुळे चाहतेही हैरान झाले आहेत.आपल्या सौंदर्याने रसिकांवर मोहिनी घालणारी जान्हवी कपूरचा विनामेकअप लूक व्हायरल झाला आहे. हा लूक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. विनामेकअप तिचा फोटो खूप व्हायरल झाला आहे. या फोटोत तिला ओळखणे थोडे कठीण झाले आहे.एरव्ही चार्मिंग, गॉर्जिअस दिसणारी जान्हवीची त्वचा खूपच निस्तेज आणि डोळ्याखालीही डागसर्कल पाहायला मिळत आहे. 

फोटोमध्ये सलवार परिधान केला असून मोकळे सोडलेल्या केसांमध्ये तिचा अवतार पाहून चाहतेच वेगवेगळ्या कमेंट करताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर आपल्या ग्लॅमरस अदांनी रसिकांना घायाळ करणारी जान्हवी यावेळी मात्र चाहत्यांच्या नकारात्मक प्रतिक्रीयांना सामोरे जावे लागत आहे. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना अजिबात आवडलेला नाहीय. नो-मेकअप लूक पाहून तिचे खरे रुप समोर आले असल्याचे प्रतिक्रीया सध्या तिच्या या फोटोवर उमटत आहेत.
 

Web Title: Janhvi Kapoor Left His Fans shocked with Her Unbelievable No Makeup Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.