जान्हवी कपूरच्या लेटेस्ट फॅशन सेन्सनी केली निराशा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 11:32 IST2017-01-13T11:32:22+5:302017-01-13T11:32:22+5:30

नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोतील तिच्या फॅशन सेन्सनी सर्वांचीच निराशा केली आहे. या फोटोंमध्ये तिने घातलेला आऊटफिट हा रिप्पी सेठी यांनी डिझाईन केल्याचे कळतेय.

Janhavi Kapoor's latest Fashion Saints did not disappoint! | जान्हवी कपूरच्या लेटेस्ट फॅशन सेन्सनी केली निराशा!

जान्हवी कपूरच्या लेटेस्ट फॅशन सेन्सनी केली निराशा!

ी टाऊन’चे स्टारकिड सध्या भलतेच फॉर्मात आहेत. त्यांची स्टाईल,फॅशन यांच्यामुळे हे स्टारकिड नेहमीच चर्चेत असतात. या सर्व स्टारकिडमधील महत्त्वाचं नाव म्हणजे जान्हवी कपूर. तिचे स्टाईल स्टेटमेंट्स आणि फॅशनसेंसविषयी नेहमी चर्चा केली जाते. मात्र, नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोतील तिच्या फॅशन सेन्सनी सर्वांचीच निराशा केली आहे. या फोटोंमध्ये तिने घातलेला आऊटफिट हा रिप्पी सेठी यांनी डिझाईन केल्याचे कळतेय. 




‘बॉलिवूडची हवाहवाई’ म्हणजेच श्रीदेवी ही ८०च्या दशकात स्टाईल आयकॉन मानली जायची. ‘इंग्लिश विंग्लिश’ नंतरही तिचा साडी, काळ्याशार के सांची वेणी असा साधेपणाचा लुक प्रेक्षकांना प्रचंड भावला. मात्र, तिची लेक जान्हवी कपूरला हे काय झाले? बी टाऊनच्या झगमगाटात आल्यापासून तिचा फॅशन सेन्स सुधारायला हवा तर तो आणखी बिघडतच चाललाय...होय, तिने शेअर केलेल्या फोटोवरून तरी असेच दिसतेय. या फोटोत तिची आई श्रीदेवी देखील शेजारी उभी असलेली दिसतेय. जान्हवीपेक्षा श्रीदेवीचा आऊटफिटच जास्त चांगला दिसतोय. बरं तरी, जान्हवीने तिच्या या ड्रेसिंगसोबतच त्यावरील ज्वेलरी घातली नाही. नाहीतर ती अजूनच जास्त वाईट दिसली असती. जान्हवी कपूर ही जेवढी साध्या मेकअपमध्ये दिसेल तेवढी ती जास्त क्यूट दिसते. काही वर्षांपूर्वी ‘केटी पेरी’ या हॉलिवूडच्या गायिकेने अशाच प्रकारचा ड्रेस घातला जो अतिशय पारदर्शक होता. जान्हवीने घातलेला हा ड्रेस देखील तसाच आहे.




जान्हवी कपूर ही आता बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज असून ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ च्या सिक्वेलमध्ये ती दिसणार असल्याचे अधिकृत सुत्रांकडून कळतेय. मात्र, अद्याप याबद्दल काहीही निश्चित झालेले नाही. दिग्दर्शक करण जोहर याचे सध्याच्या ‘बी टाऊन’ मधील स्टारकिड्सवर लक्ष आहे. ते त्यांच्या आगामी चित्रपटांमधून या सर्व स्टारकिड्सला लाँच करू इच्छितात.

Web Title: Janhavi Kapoor's latest Fashion Saints did not disappoint!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.