जान्हवी कपूर म्हणते, मी नोलनची पहिली पसंत होती...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 10:22 IST2018-06-10T04:52:24+5:302018-06-10T10:22:24+5:30

जान्हवी कपूरचा पहिला डेब्यू सिनेमा ‘धडक’ अजून रिलीज व्हायचायं. म्हणजे त्याअर्थाने जान्हवी अद्याप ‘स्टार’ व्हायचीयं. पण स्टार नसूनही चर्चेत ...

Janhavi Kapoor says, I was the first choice of Nolan ... !! | जान्हवी कपूर म्हणते, मी नोलनची पहिली पसंत होती...!!

जान्हवी कपूर म्हणते, मी नोलनची पहिली पसंत होती...!!

न्हवी कपूरचा पहिला डेब्यू सिनेमा ‘धडक’ अजून रिलीज व्हायचायं. म्हणजे त्याअर्थाने जान्हवी अद्याप ‘स्टार’ व्हायचीयं. पण स्टार नसूनही चर्चेत कसे राहायचे, ही कला जान्हवीला चांगलीच अवगत आहे. आम्ही केवळ जान्हवी सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या स्टनिंग फोटोबद्दल बोलत नसून त्यापलीकडे जात तिच्या सेन्स आॅफ ह्युमरबद्दल बोलतोय. होय, जान्हवीने सोशल मीडियावर नुकताच तिचा एक लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो कुठल्याशा बर्थ डे पार्टीतला असल्याचे भासतोय. जान्हवी यात कमालीची मस्ती मूडमध्ये आहे.शिवाय  फोटोत तिने जोकर नोज घातलेले आहे. यासोबत जान्हवीने लिहिलेले कॅप्शनही मजेशीर आहे. ‘फार कमी लोकांना माहित असेल की, मी जोकरसाठी नोलनची पहिली पसंत होती. पण धडक या चित्रपटासाठी मला तो सिनेमा सोडावा लागला,’असे कॅप्शन जान्हवीने लिहिले आहे़.



‘डार्क नाईट’ हा आधुनिक सिनेमाच्या इतिहासातील सर्वात आयकॉनिक चित्रपट आहे. क्रिस्टोफर नोलन या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. यातील जोकरचे पात्र सर्वाधिक लोकप्रीय झाले होते. ही भूमिका हिथ लेजरने साकारली होती.  हिथ एक आॅस्ट्रेलियन अभिनेते होते. चित्रपटाच्या रिलीजच्या सहा महिन्यांपूर्वीच हिथ यांचे निधन झाले होते. पण मृत्यूच्या सहा महिन्यांपूर्वी त्यांनी साकारलेली ही भूमिका अजरामर ठरली होती. यासाठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टरचा आॅस्कर पुरस्कारही मिळाला होता. 
काही महिन्यांपूर्वी रणवीर सिंग यानेही जोकरच्या  वेषातील आपला फोटो पोस्ट केला होता. त्यासाठी त्याला ट्रोलही व्हावे लागले होते. पण जान्हवीबद्दल मात्र असे काहीही नाही. जोकरच्या वेषात ती कमालीची क्यूट दिसतेय. शिवाय तिच्या सेन्स आॅफ ह्युमरचीही प्रशंसा होतेय.

ALSO READ : viral video : जान्हवी कपूरला चाहत्यांनी घेरले, गर्दीत झाले असे कृत्य!!

​सध्या जान्हवी ‘धडक’ या आपल्या डेब्यू सिनेमात बिझी आहे.  ‘धडक’हा मराठी ‘सैराट’चा रिमेक आहे. ‘सैराट’ मराठीमधील ब्लॉकबस्टर चित्रपट असून, या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. दरम्यान, ‘सैराट’च्या हिंदी ‘धडक’ची कथा काहीशी वेगळी असून, यामध्ये जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर मुख्य भूमिकेत आहेत

Web Title: Janhavi Kapoor says, I was the first choice of Nolan ... !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.