सेलिना जेटलीच्या वडिलांचे निधन; अंत्यसंस्कारासाठी पोहचली इंदूरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2017 18:46 IST2017-07-04T13:16:46+5:302017-07-04T18:46:46+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली हिचे वडील व्ही. के. जेटली यांचे निधन झाले असून, त्यांच्यावर इंदूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार ...

Jaitley's father passes away; Indore to reach the funeral! | सेलिना जेटलीच्या वडिलांचे निधन; अंत्यसंस्कारासाठी पोहचली इंदूरला!

सेलिना जेटलीच्या वडिलांचे निधन; अंत्यसंस्कारासाठी पोहचली इंदूरला!

लिवूड अभिनेत्री सेलिना जेटली हिचे वडील व्ही. के. जेटली यांचे निधन झाले असून, त्यांच्यावर इंदूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अचानकच त्यांचे निधन झाल्याने सेलिनाच्या परिवारावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, सेलिना जेटली पती आणि मुलांसह दुबई येथून इंदूरला रवाना झाली आहे. सेलिना पती व मुलांसह दुबई येथे सुट्या एन्जॉय करायला गेली होती. परंतु वडिलांच्या निधनाची बातमी ऐकताच ती इंदूरकडे रवाना झाली. 

सेलिनाच्या वडिलांनी गेल्या सोमवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर इंदूर येथेच अंतिम संस्कार होणार आहेत. सेलिनाला वडिलांच्या निधनाचे वृत्त मिळताच ती भारतीय फ्लाइटने दुबईहून इंदूरला रवाना झाली. सेलिनाचे वडील भारतीय सैन्यात होते. त्यांची प्रकृती प्रचंड खालावली होती. त्यामुळे त्यांना सातत्याने दवाखाना करावा लागत असे. अखेर गेल्या सोमवारी (दि.३) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

काही दिवसांपूर्वीच सेलिना दुसºयांदा जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याची बातमी समोर आली होती. सेलिनाने बेबी बम्प दाखविणारा एक फोटोही शेअर केला होता. त्याचबरोबर मैत्रीण अभिनेत्री ईशा देओल हिच्यासोबत बेबी बम्प दाखविणारा एक फोटो शेअर करून चाहत्यांकडून वाहवा मिळविली होती. सेलिनाने अनेक बॉलिवूडपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘नो एंट्री’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘अपना सपना मनी मनी’ यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिका विशेष गाजल्यात. 

परंतु लग्नानंतर सेलिनाने चित्रपटांपासून दुरावा निर्माण केला. सेलिनाला पाच वर्षांची जुळी मुले आहेत. सेलिना सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असल्याने तिच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. असो, जेव्हा सेलिनाच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी आली तेव्हा तिच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

Web Title: Jaitley's father passes away; Indore to reach the funeral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.