जायरा वसीम छेडछाड प्रकरण; आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 16:36 IST2017-12-14T11:06:54+5:302017-12-14T16:36:54+5:30

विस्तारा एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये अभिनेत्री जायरा वसीम हिची छेडछाड करणारा संशयित आरोपी विकास सचदेवा याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली ...

Jaira Wasim Tissue Case; The accused will be sent to judicial custody! | जायरा वसीम छेडछाड प्रकरण; आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी!

जायरा वसीम छेडछाड प्रकरण; आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी!

स्तारा एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये अभिनेत्री जायरा वसीम हिची छेडछाड करणारा संशयित आरोपी विकास सचदेवा याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. जायरा सध्या काश्मीरमध्ये असल्याने दिंडोशी न्यायालयाने ंहा निर्णय घेतला आहे. या अगोदर विकास सचदेवा याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, विकास सचदेवा याची पत्नी दिव्या सचदेवा हिने जायराचे सर्व आरोप फेटाळून लावताना तिचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे. माझे पती विकास झोपेत असताना चुकून त्यांचा पाय जायराला लागला. याबाबत त्यांनी तिची माफीही मागितली, परंतु जायराने पब्लिसिटी मिळविण्यासाठी छेडछाड केल्याचा आव आणला आहे. जायराच्या या आरोपामुळे सचदेवा परिवाराला मोठा धक्का बसला असल्याचे दिव्याने सांगितले. 

काही दिवसांपूर्वी ‘सीक्रेट सुपरस्टार’ची अभिनेत्री असलेल्या जायरा वसीमने आपल्यासोबत विस्तारा फ्लाइटमध्ये छेडछाड झाल्याचे इन्स्टाग्रामवर एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले होते. त्यानंतर पोलीस प्रशासनाने जायराच्या तक्रारीची दखल घेत तत्काळ आरोपीला अटक करण्याच्या दृष्टीने पावले उचलली होती. संशयित आरोपीची ओळख ३९ वर्षीय विकास सचदेवा या नावाने झाली. ज्यानंतर लगेचच संशयित आरोपी विकासला अटक करण्यात आली. त्याचबरोबर बॉलिवूडमध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. अनेकांनी या घटनेचा निषेध करताना आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनीदेखील प्रकरणाची तीव्रता लक्षात घेऊन संशयित आरोपी विकासवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. 

दरम्यान, विकासच्या बचावाकरिता त्याची पत्नी दिव्या सचदेवा समोर आली असून, वकिलाच्या माध्यमातून ती न्यायालयीन लढा देत आहे. विशेष म्हणजे दिव्याने धाडस करीत माध्यमांमध्ये याविषयी बोलताना जायरा वसीमवरच आरोपांची बरसात केली. तिने म्हटले की, माझे पती आमच्या कुटुंबातील एक तरुण व्यक्तीचे अंत्यसंस्कार आटोपून परत येत होते. २४ तासांपासून ते झोपले नसल्याने त्यांनी प्रवासात झोपण्याचे ठरविले. याविषयी त्यांनी क्रूला कल्पनाही दिली होती. झोपेत असतानाच चुकून त्यांचा पाय जायराला लागला. परंतु तिने पब्लिसिटी स्टंटसाठी माझ्या पतीला बळीचा बकरा बनविल्याचे म्हटले. 

Web Title: Jaira Wasim Tissue Case; The accused will be sent to judicial custody!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.