जायरा वसीम छेडछाड प्रकरणातील आरोपीचा जामीन फेटाळला; सचदेवा परिवाराच्या अडचणीत वाढ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 14:21 IST2017-12-13T08:51:59+5:302017-12-13T14:21:59+5:30
अभिनेत्री जायरा वसीम हिच्याशी फ्लाइटमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या व्यक्तीची पत्नी दिव्या सचदेवा हिच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ...

जायरा वसीम छेडछाड प्रकरणातील आरोपीचा जामीन फेटाळला; सचदेवा परिवाराच्या अडचणीत वाढ !
अ िनेत्री जायरा वसीम हिच्याशी फ्लाइटमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या व्यक्तीची पत्नी दिव्या सचदेवा हिच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. होय, न्यायालयाने संशयित आरोपी विकास सचदेवा याचा जामीन अर्ज फेटाळला असून, तो अजूनही पोलिसांच्याच ताब्यात आहे. आता त्याच्या जामीन अर्जावर १३ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने विकास सचदेवाचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर एका इंग्रजी वेबसाइटने विकासच्या परिवाराची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विकासच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की, न्यायालयाच्या या निर्णयामुळे संपूर्ण सचदेवा परिवाराला धक्का बसला आहे. विकासच्या पत्नीचे तर रडून-रडून प्रचंड वाइट हाल झाले आहेत. घरात झालेल्या एका मृत्यूनंतर ही घटना झाल्याने सचदेवा परिवाराला प्रचंड हादरा बसला आहे. विकासचे दोन लहान मुले वारंवार त्यांच्या पप्पाची आठवण काढीत आहेत. केवळ पब्लिसिटी स्टंटकरिता जायराने विकासला या संपूर्ण प्रकरणात गोवल्याचे त्यांच्या परिवाराकडून बोलले जात आहे. सध्या सचदेवा परिवार सातत्याने वकिलांच्या संपर्कात आहे.
दरम्यान, विकासची पत्नी दिव्या सचदेवा ही सुरुवातीपासून माझे पती निर्दोष असल्याचे म्हणत आहे. त्याचबरोबर तिने जायरासमोर काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. जर जायरासोबत छेडछाड होत होती, तर तिने त्याचवेळी फ्लाइटमध्ये किंवा विमानतळावर तक्रार का केली नाही? जायराला इन्स्टाग्रामवर येण्यासाठी दोन तास का लागले? केवळ पब्लिसिटी स्टंटकरिता माझ्या पतीला बळीचा बकरा बनविण्यात आल्याचेही दिव्याने म्हटले. दिव्याने पतीच्या समर्थनार्थ म्हटले की, ‘माझ्या पतीने तिची छेडछाड केली नाही. आमच्या परिवारातील एक तरुण सदस्याचे निधन झाले, ज्याकरिता ते गेले होते. माझे पती गेल्या २४ तासांपासून झोपले नव्हते. त्यांनी क्रूला सांगितले होते की, मला कोणीही त्रास देऊ नये, कारण मला झोपायचे आहे. त्यांनी झोपताना पाय वर केले होते. त्यामुळेच त्यांचा पाय जायराला लागला होता.
![]()
दरम्यान, जायरा वसीमने दिल्ली-मुंबई फ्लाइटमध्ये माझ्याशी छेडछाड केल्याचा आरोप केला होता. यावेळी जायराने रडतानाचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. जायराचा हा व्हिडीओ बघून विकास सचदेवाला पोलिसांनी अटक केली होती. त्याचबरोबर त्याच्यावर छेडछाडअंतर्गत पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. परंतु जायराचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर तर तिच्या या प्रतापाचा सर्वत्र समाचार घेतला जात आहे.