‘जग्गा जासूस’ पुन्हा टांगणीवर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 04:48 IST2016-02-16T11:48:16+5:302016-02-16T04:48:16+5:30
रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांचा ‘जग्गा जासूस’ फार चर्चेत आहे. दोन वर्षांपासून त्याची शूटिंग सुरू असून अद्याप त्याची ...

‘जग्गा जासूस’ पुन्हा टांगणीवर?
र बीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांचा ‘जग्गा जासूस’ फार चर्चेत आहे. दोन वर्षांपासून त्याची शूटिंग सुरू असून अद्याप त्याची शूटिंग पूर्ण झालेली नाही. मध्यंतरी रणबीर-कॅटचा ब्रेकअप झाला त्यामुळेही चित्रपटाच्या शूटिंगला उशीर होतोय. आता तर म्हणे पुन्हा चित्रपटाच्या शूटिंगला ग्रहण लागले आहे. रणबीर-कॅटच्या चाहत्यांसाठी पुन्हा एकदा वाईट बातमी आहे. चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. जूनमध्ये रिलीज होणारा जग्गा जासूस आता जूलै-आॅगस्टच्या दरम्यान रिलीज होणार आहे. कॅट यात जर्नालिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे.